‘बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी, सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच…’; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

| Updated on: Jan 23, 2024 | 9:15 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची नाशिकमध्ये अनंत कान्हेरे मैदानावर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून भाजपवर गंभीर आरोप करत जोरादार टीका केली आहे.

बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी, सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच...; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
UddhavThackeray Devendra Fadnavis Nashik Sabha
Follow us on

नाशिक : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेमध्ये भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर  जहरी टीका केली. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी सीबीआयच्या चौकशांवरून बोलताना ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलं आहे. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा, असं ठाकरे म्हणालेत.

ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. मी वारसा घेऊन निघालो आहे. दंगल झाली की पळणारी ही अवलाद आहे. आमच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकतात. घर माझ्या कार्यकर्त्याचं पाय ताणून बसतात हे नालायक लोकं. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला बंदोबस्तात राहणार. तुमच्या यंत्रणांचा पगार सामानान्यांच्या खिशातून जातात हे यंत्रणाने लक्षात ठेवावं. भेकड लेकाचे. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी. भेकडांची पार्टी आहे. स्वतमध्ये कर्तृत्व नाही. नेता तर देऊ शकत नाही. भाकड तर आहातच पण भेकडही आहात आणि म्हणे हिंदुत्ववादी. हे कुठलं हिंदुत्व? असा सवालही ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरेंनी भाषणात केला वाजपेयींचा उल्लेख

राम मंदिर बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. काश्मीरमधील 370 कलम हटवण्यासाठी पाठिंबा दिला होता. कठीण काळात तुम्हाला शिवसेनेची सोबत लागली. वाजपेयी यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते.  शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला मदत केली. ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. हे तुमचं हिंदुत्व? आम्ही मैदानात आहोत. जो फैसला होईल तो मंजूर आहे. हे कडेकोट बंदोबस्तात राहणार. आमचं संरक्षण काढलं. आहे ते संरक्षणही काढा. समोर बसलेला जमाव आमचं संरक्षण आहे. या अंगावर यायचं असेल तर या. तुम्ही 56 इंचाची छाती दाखवता, आमच्या शेतकऱ्यांची सुकलेली छातीच तुम्हाला भारी पडेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.