AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...

Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच…

| Updated on: Jun 28, 2026 | 4:48 PM
Share

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ सभा घेतली तर आज सकाळी तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं.  ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावर असून

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ सभा घेतली तर आज सकाळी तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं.  ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावर असून यावेळी परळीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. जेसीबीमधून फुलांची उधळण करत उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता.

परंड्यातील शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना पाच ज्योतिर्लिंगांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रतिमा हातात घेत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला.

धाराशिव हा ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ असल्याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत. अलीकडील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहनही केले.

Published on: Jun 28, 2026 04:48 PM

Follow Us