तरुणाचा मृतदेह डिक्कीत आढळल्याने खळबळ; मित्रानेच पैशांमुळे खून केल्याचा संशय

तरुणाची हत्या करुन मृतदेह कारच्या डिक्कीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथे घडला आहे. पवन आचरा असं मृत तरुणाचं नाव आहे. पवन हा सोमवारपासून (16 नोव्हेंबर) बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते.

तरुणाचा मृतदेह डिक्कीत आढळल्याने खळबळ; मित्रानेच पैशांमुळे खून केल्याचा संशय

ठाणे : तरुणाची हत्या करुन मृतदेह कारच्या डिक्कीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथे घडला आहे. पवन आचरा असं मृत तरुणाचं नाव आहे. पवन हा सोमवारपासून (16 नोव्हेंबर) बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर उल्हासनगरमधील नागरिकांना पवनचा मृतदेह कारच्या डिक्कीत आढळल्याने एकच  खळबळ उडाली. दरम्यान मित्रानेच त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Ulhasnagar murder, dead body of young man found in car)

मिळालेल्या माहितीनुसार, पवन आचरा नावाचा तरुण सोमवारपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांकडून त्याची शोधाशोध सुरु होती. मित्रांकडे चौकशी करुनदेखील त्याचा पत्ता लागत नसल्याने कुटुंबीय हैराण होते. त्यानंतर उल्हासनगर परिसरातील नागरिकांना अज्ञात तरुणाचा मृत्यू कारच्या डिक्कीत ठेवलेला आढळला. अचानक सापडलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होत. त्यानंतर नागरिकांनी हिललाईन पोलिसांना पाचारण करुन घटनेची माहिती दिली. हा मृतदेह कारच्या डिक्कीत सापडल्याचे नागरिकांनी सांगतिले.

या खुनाची माहिती समजताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा मृत्यू पवन आचरा या तरुणाचाच असल्याची ओळख पटली. दरम्यान, हिललाईन पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनचा खून नेमका कुणी केला याविषयी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. ज्या ठिकाणी कारच्या डिक्कीत मृतदेह सापडला त्या परिसरातील नागरिकांचीही पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणी पवनच्या कुटुंबीयांचीही पोलीस चौकशी करतील. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पवनचा खून त्याच्या मित्रानेच केल्याचा संशय पोलिसांना आहे. (Ulhasnagar murder, dead body of young man found in car)

संबंधित बातम्या :

शौचाल्याच्या टाकीचे झाकण उघडे, खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

भाऊ-बहिणीचा अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न, बहिणीचा मृत्यू

ऐन दिवाळीत प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या, पतीने विष घेऊन तर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI