AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

vvmc election 2022 ward 15 | हितेंद्र ठाकुरांच्या वसई विरार महापालिकेत भाजप-शिंदेसेना घुसखोरी करणार का? प्रभाग 15 चे गणित काय?

वसई विरार महापालिकेतील नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग 15 मध्ये तुळीज हॉस्पिटल, मोरेश्वर विद्यालय, श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर, नगीनदास पाडा, गायत्री शक्तीपीठ, भास्कर कॉम्प्लेक्स, मोरेगाव पाण्याची टाकी आदी परिसर येतो.

vvmc election 2022 ward 15 | हितेंद्र ठाकुरांच्या वसई विरार महापालिकेत भाजप-शिंदेसेना घुसखोरी करणार का? प्रभाग 15 चे गणित काय?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 07, 2022 | 6:00 AM
Share

मुंबईः राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सत्तेला हादरा देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपने सत्तांतर घडवून आणलं. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही  जनतेचा कौल कुणाकडे आहे, हे स्पष्ट झाले. आता आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे सेनेची ताकद कशी प्रभावी ठरेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे नेमकी शिवसेना कुणाची हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील विविध याचिकांवर अवलंबून आहे. सध्या तरी शिवसेनेत उभी फूट पडल्याने स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. वसई-विरार महापालिकेचा (Vasai Virar Municipal corporation) विचार करता एकनाथ शिंदे गटातील बंडाचे येथे फार पडसाद उमटणार नाहीत, असं दिसतंय. कारण बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची येथे एकहाती सत्ता आहे. 2017 मध्ये ११५ पैकी १०७ वॉर्डांवर बविआचे नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचे ५ नगरसेवक सत्तेत होते. आता नव्या रचनेनुसार त्रिदस्यीय प्रभाग रचना झाली असून वॉर्डांची गणितं काहीशी बदलण्याची चिन्ह आहेत. मात्र हितेंद्र ठाकुरांच्या गडात इतर पक्षांची घुसखोरी होणार का हा प्रश्न आहे. प्रभाग 15 क्रमांकमधील राजकीय गणितं काय आहेत, हे पाहुयात…

वसई विरार महापालिकेवर सध्या बहुजन विकास आघाडीची अर्थात आमदार हितेंद्र ठाकूर यांची सत्ता आहे. महापालिकेची मुदत संपली असल्यामुळे अनिलकुमार पवार हे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक आहेत. वसई विरार महापालिकेची एकूण लोकसंख्या 12 लाख 34 हजार 690 एवढी आहे. तर अनुसूचित जातींची संख्या 51 हजार 468 एवढी आहे. येथील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 58 हजार 608 एवढी आहे. वसई-विरार महापालिकेतील नव्या प्रभाग रचनेनुसार 126 वॉर्ड असून 42 प्रभाग आहेत. महापालिकेतील आरक्षणही जाहीर झाले आहे. सध्या मह

प्रभाग 15 ची लोकसंख्या कशी?

वसई विरार महापालिकेतील प्रभाग 15 मध्ये एकूण लोकसंख्या 32 हजार 615 एवढी आहे. येथील अनुसूचित जातींची संख्या 2014 आहे तर अनुसूचित जमातींची संख्या 843 एवढी आहे.

प्रभाग 15 मध्ये कोणता परिसर?

वसई विरार महापालिकेतील नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग 15 मध्ये तुळीज हॉस्पिटल, मोरेश्वर विद्यालय, श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर, नगीनदास पाडा, गायत्री शक्तीपीठ, भास्कर कॉम्प्लेक्स, मोरेगाव पाण्याची टाकी आदी परिसर येतो.

2017 चे नगरसेवक कोण?

वसई विरार महापालिकेत 2017 मधील निवडणुकीत प्रभाग 15 मध्ये सुषमा संजय लोपिस यांचा विजय झाला होता.

प्रभाग 15 चे आरक्षण कसे?

वसई विरार महापालिकेत प्रभाग 15 अ हा ओबीसी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर प्रभाग 15ब हा सर्वसाधारण महिला आणि प्रभाग 15 क सर्वसाधारण गटासाठी निश्चित करण्यात आला आहे.

2017 मधील पक्षीय बलाबल कसे?

यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे होते- बहुजन विकास आघाडी- 107, शिवसेना- 05, भाजप- 01, मनसे- 01, अपक्ष- 01, एकूण 115

vvmc election 2022 ward 15 A | वसई-विरार महापालिका वॉर्ड 15 अ

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
इतर

vvmc election 2022 ward 15 B | वसई-विरार महापालिका वॉर्ड 15 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
इतर

vvmc election 2022 ward 15 B | वसई-विरार महापालिका वॉर्ड 15 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
इतर

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?