NMMC Election 2022 : शिवसेना की भाजपा? नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग 40च्या निकालाची उत्सुकता

नवी मुंबई महापालिकेत मागील वेळी शिवसेनेनेच्या उमेदवाराने बाजी मारली होती. यावेळी निकाल शिवसेनेच्या किंवा भाजपाच्या बाजूने लागणार, याविषयी उत्कंठा असणार आहे. कारण याठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.

NMMC Election 2022 : शिवसेना की भाजपा? नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग 40च्या निकालाची उत्सुकता
नवी मुंबई महापालिका, वॉर्ड क्र. 40
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Aug 06, 2022 | 4:57 PM

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची (NMMC Election 2022) रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिकेची मुदत 2020मध्येच संपली होती. मात्र कोविड काळामुळे निवडणूक पुढे ढकलत गेली. आता यावर्षी इतर महापालिकांसोबतच नवी मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. वेगळी असणार आहे. या महापालिकेत पहिल्यांदाच तीन सदस्यीन नगरसेवक (Corporator) पद्धतीने निवडणूक होणार आहे. यावेळी प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही बाबीत नवी मुंबईत मोठे बदल झाले आहेत. 3 नगरसेवक एका प्रभागात असणार आहेत. आरक्षणही बदलले असल्यामुळे इच्छुक आपल्यासाठी योग्य असा प्रभाग निवडत असल्याचे दिसत आहे. येथील प्रभाग 40मध्ये शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसून आले. मात्र यंदा कुणाचे वर्चस्व पाहायला मिळणार, याची उत्सुकता आहे. शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. तर महाविकास आघाडीमार्फत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस लढणार असल्याची शक्यता आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 40ची बेलापूर सेक्टर 15, 15 (A), नेरूळ सेक्टर 32, 38, 42 (A), 44, 50, 52, 54, किल्ले गावठाण, मुख्यालय, एसटीपी, एनआयआर कॉम्प्लेक्स आणि इतर अशी व्याप्ती आहे. तर वाशी-पनवेल रेल्वमार्ग, बँक ऑफ इंडिया, भुखंड क्र. जी 13, 14, 27, 28 समोरील रस्त्याने भुखंड क्र. 4, 5, पनवेल खाडी आदी ठिकाणे समाविष्ट आहेत.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 40मधील एकूण लोकसंख्या 31,403 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 2154 इतकी असून अनुसूचित जमाचीची लोकसंख्या 290 एवढी आहे.

कोण मारणार बाजी?

नवी मुंबई महापालिकेत मागील वेळी शिवसेनेनेच्या उमेदवाराने बाजी मारली होती. यावेळी निकाल शिवसेनेच्या किंवा भाजपाच्या बाजूने लागणार, याविषयी उत्कंठा असणार आहे. कारण याठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा अशा सर्वच पक्षांतील या घडामोडी आहेत.

विजयी उमेदवार (2015)

शिवराम परशुराम पाटील – शिवसेना

प्रभाग 40 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 40 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 40 (C)

हे सुद्धा वाचा

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

प्रभाग 40चे आरक्षण यावेळी बदलले आहे. मागील वेळी असणाऱ्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. तीन सदस्यीय वॉर्डरचना असणार आहे. त्यानुसार 40 अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें