42 दिवसात 20 हजार शिक्षकांची भरती, विनोद तावडे यांची घोषणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

लातूर: आजपासून अर्थात 21 जानेवारीपासून 42 दिवसात म्हणजेच 5 मार्चपर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिताही लागू होईल. मात्र आचारसंहितेपूर्वीच अर्थात 5 मार्चपर्यंत 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहेत.  इतकंच […]

42 दिवसात 20 हजार शिक्षकांची भरती, विनोद तावडे यांची घोषणा
Follow us on

लातूर: आजपासून अर्थात 21 जानेवारीपासून 42 दिवसात म्हणजेच 5 मार्चपर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिताही लागू होईल. मात्र आचारसंहितेपूर्वीच अर्थात 5 मार्चपर्यंत 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहेत.  इतकंच नाही तर येत्या 6 महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल, असं तावडे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं आयोजित शिक्षण परिषदेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

शिक्षकांची भरती करण्यासाठी जसे पात्र उमेदवार आतूर आहेत, अगदी तसंच सरकारही तयार आहे. मात्र काही संस्थाचालक न्यायालयात गेल्याने, या भरतीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता मराठा आरक्षण आणि दहा टक्के आर्थिक मागास आरक्षण अशी सर्व प्रक्रिया पूर्ण करून, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार शिक्षकांची मोठी भरती करणार आहे, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, 24 हजार शिक्षक भरती पुढच्या महिन्यानंतर होईल आणि त्यातही मराठ्यांना आरक्षण मिळेल. म्हणजेच 24 हजार शिक्षक भरतींमध्ये जवळपास 3 हजार 840 जागा या मराठ्यांसाठी राखीव असतील.

मराठा आरक्षण

लवकरच शिक्षक भरती होणार आहे, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, मराठा समाजाला शिक्षक भरतीत  16 टक्के म्हणजेच 3 हजार 840 जागा राखीव असतील असं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला, जानेवारीपासून भरती सुरु    

आता मराठा तरुणांचीच मेगाभरतीविरोधात याचिका!  

शिक्षकांच्या 24 हजार जागांमध्ये मराठ्यांसाठी 16 टक्के जागा राखीव  

विनोद तावडेंकडून शिक्षकांसाठी गुड न्यूज