शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला, जानेवारीपासून भरती सुरु

मुंबई: मेगाभरतीपाठोपाठ शिक्षक भरतीच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या जानेवारी महिन्यात शिक्षक भरती करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 24 हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदं भरणार असल्याची माहिती दिली होती. या शिक्षकांच्या प्रस्तावित 24 हजार जागांमध्ये मराठा समाजाला 16 …

शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला, जानेवारीपासून भरती सुरु

मुंबई: मेगाभरतीपाठोपाठ शिक्षक भरतीच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या जानेवारी महिन्यात शिक्षक भरती करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 24 हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदं भरणार असल्याची माहिती दिली होती. या शिक्षकांच्या प्रस्तावित 24 हजार जागांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के जागा राखीव असतील असं तावडे यांनी विधानसभेत सांगितलं होतं.

त्यानंतर आता ही भरती जानेवारी महिन्यात सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, 24 हजार शिक्षक भरती पुढच्या महिन्यानंतर होईल आणि त्यातही मराठ्यांना आरक्षण मिळेल. म्हणजेच 24 हजार शिक्षक भरतींमध्ये जवळपास 3 हजार 840 जागा या मराठ्यांसाठी राखीव असतील.

लवकरच शिक्षक भरती होणार आहे, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, मराठा समाजाला शिक्षक भरतीत  16 टक्के म्हणजेच 3 हजार 840 जागा राखीव असतील असं सांगितलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विनोद तावडेंनी शिक्षकांसाठी गुड न्यूज दिली होती. राज्यातील जवळपास 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचं विनोद तावडे म्हणाले आहेत. अर्थसंकल्पात पावणे तीनशे कोटींची तरतूद यासाठी केली जाणार आहे.

संबंधित बातम्या 

विनोद तावडेंकडून शिक्षकांसाठी गुड न्यूज  

शिक्षकांच्या 24 हजार जागांमध्ये मराठ्यांसाठी 16 टक्के जागा राखीव

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *