OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला स्थगिती देताना काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)ला सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं स्थगिती दिली आहे. इम्पेरिकल डेटा (Empirical Data) देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला स्थगिती देताना काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
ओबीसी आरक्षणाची सुनावणी 28 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 1:25 PM

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)ला सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला झटका बसला आहे. राज्य सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. तर ही स्थगिती देताना न्यायालयाने विविध कारणे सांगितली आहेत. नेमकी कारणे काय, तसेच काय युक्तीवाद झाला, पाहुया…

डेटा सदोष

इम्पेरिकल डेटा (Empirical Data) देऊ शकत नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केले. न्यायालयानेही ते ग्राह्य धरले. केंद्राने प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले, की 2011च्या जनगणनेदरम्यान एकत्रित केलेली माहिती केवळ अनुसूचित जाती आणि जमाती(SC, ST)साठी होती. Socio Economic and Caste Census (SECC)चा वापर मंत्रिमंडळाने स्वतंत्र निर्णयाद्वारे केला होता. तो ओबीसींच्या सर्वेक्षणासाठी नव्हता. देशातील सर्व घरांची जातव्यवस्थेची स्थिती निश्चित करण्यासाठी होता. तो डेटा सदोष असल्याने तो देता येणार नाही, अशी भूमिका केंद्राने मांडली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यात नकार दिला आहे.

‘तोवर स्थगिती द्यावी’

मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद करताना म्हटले आहे, की यांनी सहा महिन्यात डेटा गोळा करावा. या परिस्थितीत निवडणुकांना स्थगिती द्यावी. तीन महिने कामगिरी पाहावी, असे म्हटले आहे. आकाश-पाताळ एक करू, पण डेटा गोळा करू असेही रोहतगी यांनी म्हटले आहे. तर तुम्ही योग्य वेळी पावले उचचली असती तर ही वेळ आली नसती, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, दोन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

105 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा निर्णय

जवळपास 105 नगर पंचायतींच्या निवडणुका यावर अवलंबून आहेत. केंद्र सरकार या डेटावर आधारित विविध योजना राबवत आहे. मात्र राज्य सरकारला तो डेटा मिळत नाही. त्यामुळे जाणिवपूर्वक केंद्र सरकार डेटा देत नसल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे. तर आता थोड्या वेळात निवडणुका होणार की नाही, याचा निर्णय येणार आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

SC on OBC Reservation | ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम, राज्य सरकारला झटका, याचिका फेटाळली, केंद्राला आदेश द्यायलाही कोर्टाचा नकार

Malegaon riots| मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी शरण, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर आरोपांच्या फैरी

साताऱ्यातील मलवडी येथील खंडोबाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी!

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.