‘कुछ कुछ होता है’मधील ‘हा’ चिमुकला सध्या काय करतो?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांची सुपर-डुपरहिट लव्हस्टोरी असलेला ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा प्रदर्शित होऊन 20 वर्षे झाली. 1998 च्या ऑक्टोबर महिन्यात ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. आज 20 वर्षांनंतरही हा सिनेमा रसिकांना भुरळ घालतो आहे. या सिनेमातील चिमुकला ‘सरदार’ सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला होता. ‘तुस्सी ना जाओ’ या एका डायलॉगवर […]

'कुछ कुछ होता है'मधील 'हा' चिमुकला सध्या काय करतो?

सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांची सुपर-डुपरहिट लव्हस्टोरी असलेला ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा प्रदर्शित होऊन 20 वर्षे झाली. 1998 च्या ऑक्टोबर महिन्यात ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. आज 20 वर्षांनंतरही हा सिनेमा रसिकांना भुरळ घालतो आहे. या सिनेमातील चिमुकला ‘सरदार’ सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला होता. ‘तुस्सी ना जाओ’ या एका डायलॉगवर भाव खाऊन गेलेला ‘चिमुकला सरदारजी’ सध्या काय करतोय, याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच असेल. तर या चिमुकल्याचा शोध आम्ही घेतला आहे :

परजान दस्तूर असे या चिमुकल्या सरदारजीचे नाव आहे. परजान आता 27 वर्षांचा झाला असून, तो आताही सिनेक्षेत्राशी संबंधित आहे. वेगवेगळ्या सिनेमांमध्य लहान-मोठ्या भूमिका परजान करत असतो. ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील काही ओळींचे डायलॉग आणि शाहरुख-काजोलसोबतचे सीन यामुळे परजान घराघरात पोहोचला. त्याचा निरागसपणा सगळ्यांनाच भावला. त्याच्या भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं गेलं, कौतुक केलं गेलं.

‘कुछ कुछ होता है’ सिनेमातून सिनेक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या परजान दस्तूर याने ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमातही छोटीशी भूमिका साकारली होती. मोहब्बते, जुबेदा या सिनेमातही परजानने भूमिका केल्या होत्या. त्यानंतर परजानने 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘परजानिया’ आणि 2009 मध्ये ‘सिकंदर’मध्येही काम केले होते. मात्र, इथवर बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या परजान दस्तूरने पुढे बिग बजेट सिनेमाशी संबंधित कामं केली आहेत.

स्टुडंट ऑफ द इयर, गोरी तेरे प्यार में आणि फितूर यांसारख्या सिनेमांच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती. गेल्या वर्षी म्हणजे 2017 साली ‘पॉकेट मम्मी’ नावाची शॉर्ट फिल्मममध्ये ‘रोजा’फेम मधू यांच्यासोबत काम केले होते. उबर इट्स या फूड डिलिव्हरी वेबसाईट आणि अॅपच्या जाहिरातीतही परजान दस्तूर मध्यंतरी दिसला होता.

एकंदरीत परजान दस्तूर कुठल्या ना कुठल्या भूमिकेतून अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेच. कधी जाहिरातीत काम, कधी कुठल्या शॉर्टफिल्ममध्ये काम, तर कधी सिनेदिग्दर्शनाची जबाबदारी असेल, परजान सिनेमाशी जोडलेला आहेच.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI