AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अगोदर वादळांना फक्त महिलांचीच नावं दिली जायची!

भुवनेश्वर : ओदिशामध्ये धुमाकूळ माजवल्यानंतर सायक्लोन फनी चक्रीवादळ कोलकात्याजवळील समुद्र किनाऱ्याच्या भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोलकात्यामध्ये वेगवान वारं आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शुक्रवारी सायंकाळी हे वादळ पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार असल्याचं दुपारी सांगण्यात आलं होतं. हवेचा वेग जवळपास 100 ते 110 किमी प्रति तास आहे. शिवाय यामध्ये पावसाचीही भर असल्यामुळे प्रशासनालाही मेहनत करावी लागत […]

अगोदर वादळांना फक्त महिलांचीच नावं दिली जायची!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

भुवनेश्वर : ओदिशामध्ये धुमाकूळ माजवल्यानंतर सायक्लोन फनी चक्रीवादळ कोलकात्याजवळील समुद्र किनाऱ्याच्या भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोलकात्यामध्ये वेगवान वारं आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शुक्रवारी सायंकाळी हे वादळ पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार असल्याचं दुपारी सांगण्यात आलं होतं. हवेचा वेग जवळपास 100 ते 110 किमी प्रति तास आहे. शिवाय यामध्ये पावसाचीही भर असल्यामुळे प्रशासनालाही मेहनत करावी लागत आहे.

वादळाचे प्रकार – हरीकेन्स, टायफून्स आणि सायक्लोन

तुम्ही अमेरिकेत वादळ आल्यानंतर हरीकेन्स हे नाव ऐकलं असेल. ही सर्व उष्णकटीबंधीय वादळाची नावं आहेत. फनी हे देखील याच प्रकारचं वादळ आहे. जगातील विविध भागात उष्णकटीबंधीय वादळाला वेगवेगळी नावं दिली जातात. अधिकृतपणे वादळाचं नाव ठेवण्याची प्रथा 1953 मध्ये सुरु झाली. पण प्रत्येकच वादळाला नाव दिलं जात नाही. 63 किमी प्रति तास वेग असलेल्या वादळालाच नाव दिलं जातं. याशिवाय ज्या वादळाचं नाव 118 किमी प्रति तास असेल त्याला गंभीर स्वरुपात पाहिलं जातं. 221 किमी प्रति तास वेगाच्या वादळाला सुपर चक्रीवादळ म्हटलं जातं.

फनीचा अर्थ साप

फनी वादळाने उत्तर हिंद महासागरातून डोकं वर काढलंय. त्यामुळे या भागात येणाऱ्या देशांकडूनच या वादळाला नाव देण्यात आलं, ज्यामध्ये बांगलादेशचाही समावेश आहे. फनीला हे नाव बांगलादेशकडूनच मिळालंय. फनीचा अर्थ साप असा होतो.

वादळ हा पुल्लिंगी शब्द असला तरी अगोदर वादळाला फक्त महिलांचंच नाव दिलं जायचं. A ते W या अक्षरांमध्ये जेवढ्या महिलांची नावं येतात, त्यांना वादळाची नावं दिली जातील, अशी परंपरा 1953 मध्ये अमेरिकेच्या हवामान विभागाने पाडली. नंतर महिला संघटनांनी याचा विरोध केला आणि 1978 मध्ये निश्चित करण्यात आलं की वादळाला महिलांसोबतच पुरुषांचीही नावं दिली जातील.

भारत आणि आसपासच्या क्षेत्रातला नियम काय?

भारत आणि आसपासच्या क्षेत्रात वादळाला नाव देण्याची परंपरा 2000 नंतर सुरु झाली. या क्षेत्रात बांगलादेश, भारत, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंडचा समावेश आहे. या देशांनी अगोदरपासूनच आपल्या नावांची यादी तयार केलेली आहे.

वादळाला नाव देण्यासाठी सध्या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेने नियम तयार केलेला आहे. यानुसार, ज्या भागात वादळ येईल, त्या भागातलं नाव दिलं जातं. याचा अर्थ असा होतो, की वर्षातील पहिल्या वादळाला A आणि पुढच्या वादळाला B पासून सुरु होणारं नाव दिलं जाईल. सम संख्या असलेल्या वर्षातील (उदा. 2018) वादळाला पुरुषांचं नाव दिलं जातं, तर विषम संख्या असलेल्या वादळांना (उदा. 2019) महिलांचं नाव दिलं जातं.

पूर्व किनाऱ्यावरील वादळांचं कारण काय?

फनी वादळापूर्वी गेल्या वर्षी गाझा वादळाने तामिळनाडूमध्ये हाहाःकार माजवला होता. यामध्ये 20 लोकांचा जीव गेला होता. आतापर्यंतच्या इतिहासात 35 मोठी वादळं आली आहेत, ज्यापैकी 26 वादळांचा जन्म बंगालच्या खाडीतून झाला. हवा वाहण्याची पद्धत यासाठी जबाबदार मानली जाते. यामुळे पश्चिमी समुद्र किनारे थंड राहतात आणि वादळासाठी वातावरण अनुकूल नसतं. पश्चिम क्षेत्रातील अनेक वादळं यापूर्वी ओमानकडे सरकली आहेत. पण यापासून भारताला धोका नसतो.

गेल्या 200 वर्षांमध्ये वादळांचा सर्वाधिक फटका बांगलादेशला झाला आहे. वादळात मृत्यू झालेल्यांमध्ये 40 टक्के बांगलादेशचे नागरिक आहेत. तर भारतामध्ये ओदिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये वादळाचा फटका बसतो.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.