पाकिस्तानातील मोदींच्या प्रेतयात्रेमागील व्हायरल सत्य काय?

पाकिस्तानातील मोदींच्या प्रेतयात्रेमागील व्हायरल सत्य काय?

मुंबई: सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेतयात्रेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही प्रेतयात्रा पाकिस्तानात काढली गेल्याचं या व्हायरल मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. मोदींच्या प्रेतयात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. या फोटोसोबत मेसेजही व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ ही प्रेतयात्रा पाकिस्तानात काढण्यात आल्याचं म्हटलं […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेतयात्रेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही प्रेतयात्रा पाकिस्तानात काढली गेल्याचं या व्हायरल मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. मोदींच्या प्रेतयात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. या फोटोसोबत मेसेजही व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ ही प्रेतयात्रा पाकिस्तानात काढण्यात आल्याचं म्हटलं आहे.  भारतानं पाकवर केलेलं सर्जिकल स्ट्राईक, सीमाभागतील आक्रमक कारवाया याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानात मोदींच्या निषेधार्थ ही प्रेतयात्रा काढल्याचं सांगितलं जातंय. पण हे फोटो आणि व्हिडीओ खरे आहेत का? तसंच ते पाकिस्तानातील आहेत का?

फोटो आणि व्हिडीओ पाहिला असता, या फोटोतील जमावाच्या पेहराव्यावरुन ते खरंच पाकिस्तानातील आहेत का असा प्रश्न पडतो.

दुसरा मुद्दा…यात जी नारेबाजी ऐकायला येते ती उर्दू भाषेत नाहीच, ती वेगळीच भाषा आहे.

मर गया मोदी, मर गया खट्टरची नारेबाजी

तिसरा मुद्दा…हा की इथे लुंगी घातलेले काही लोक दिसत आहेत. आम्ही जेव्हा यातील फोटोंची रिव्हर्स इमेजद्वारे पडताळणी केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे फोटो 25 जानेवारी 2017 रोजी अपलोड करण्यात आले आहेत. म्हणजे हे फोटो आताचे नसून गेल्या वर्षीचे आहेत. या शोधकार्याच्यावेळी आमच्या हाती काही ट्वीटही लागले. ज्यात स्पष्ट दिसतं की हे फोटो आणि ही प्रेतयात्रा 3 राज्यातील म्हणजेच मध्य प्रदेश, छ्त्तीसगड आणि राजस्थानमधील मोदींच्या पराभवानंतरची आहे.

आता प्रश्न पुन्हा येतो की ही प्रेत यात्रा नेमकी कुठली आहे ? तर यातील नारेबाजी आपण लक्ष देऊन ऐकली तर ही तमीळ भाषा आहे, ज्यात नरेंद्र मोदी आणि खट्टर यांच्याविरोधात नारेबाजी केली जात आहे.

म्हणजेच हा व्हिडिओ दक्षिण भारतातला आहे. आणि ही मोदींची प्रेत यात्रा पाकिस्तानातली असल्याचा दावा साफ खोटा आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें