Sushant Singh Rajput suicide | मैत्रिणीसोबत नव्या फ्लॅटचा शोध, सहकाऱ्याने फोन न उचलणे, दाटून आलेलं नैराश्य ते गळफास

सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. (Sushant Singh rajput suicide reason)

Sushant Singh Rajput suicide | मैत्रिणीसोबत नव्या फ्लॅटचा शोध, सहकाऱ्याने फोन न उचलणे, दाटून आलेलं नैराश्य ते गळफास

Sushant Singh Rajput suicide मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला आहे. सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. (Sushant Singh rajput suicide reason)

प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. फोटोतही त्याच्या गळावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची , मित्रांची पोलिसांनी चौकशी केली, प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. मानसिक तणाव हे कारण समोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

आत्महत्येचं पाऊल का उचललं?

आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेले अनेक दिवस सुशांत हा डिप्रेशनमध्ये होता. त्याची मैत्रिण रिया आणि तो नीवन फ्लॅट शोधत होते. त्याला नवीन फ्लॅट हवा होता. त्यानंतर तो या वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता.

एक दोन दिवसात डिप्रेशन येत नाही. गेले काही दिवस तो तणावाखाली असल्याचं त्याच्या जवळच्या मित्रांनी सागितलं. त्यामुळे तो कुठल्या डॉक्टरकडून उपचार घेत होता, त्याला कशाचं डिप्रेशन होतं, त्याचे मेडिकल डॉक्युमेंट या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत.

काल रात्री अभिनेत्याला फोन

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने काल रात्री एका अभिनेत्याला फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या अभिनेत्याने फोन न उचलल्यामुळे त्याचं बोलणं होऊ शकलं नाही. हा अभिनेता नेमका कोण, त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. फोटोतही त्याच्या गळावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची , मित्रांची पोलिसांनी चौकशी केली, प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. मानसिक तणाव हे कारण समोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE | सुशांतचं पार्थिव कूपर रुग्णालयात

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?   

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या 

Published On - 5:40 pm, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI