
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग आता फुंकलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जाहीर घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद देऊन ही माहिती जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.
देशात 97 कोटी मतदार
आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
महाराष्ट्रात ५ टप्प्यांत मतदान, तुमच्याकडे कधी जाणून घ्या..
दरम्यान देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून महाराष्ट्रातही लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात कुठे कधी होणार मतदान ?
पहिला टप्पा
19 एप्रिल 2024
एकूण 5
दुसरा टप्पा
26 एप्रिल 2024
एकूण 8
तिसरा टप्पा
7 मे 2024
एकूण 11
चौथा टप्पा
13 मे 2024
एकूण 11
पाचवा टप्पा
20 मे 2024
एकूण 13
राज्यातील एकूण 48 जागांसाठी हे मतदान होणार असून संपूर्ण देशातील मतमोजणीचा निकाल हा 4 जून 2024 लागणार आहे.