AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Election 2024 : खबरदार ! दोन वेळा मतदान कराल तर अडकाल… निवडणूक आयोगाचा इशारा

संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिदषद घेऊन ही घोषणा केली. 19 एप्रिल पासून देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून 1 जून रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होईल.

Lok Sabha Election 2024 : खबरदार ! दोन वेळा मतदान कराल तर अडकाल... निवडणूक आयोगाचा इशारा
| Updated on: Mar 16, 2024 | 4:30 PM
Share

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिदषद घेऊन ही घोषणा केली. 19 एप्रिल पासून देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून 1 जून रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली.

मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी राजीव कुमार यांनी अनेक महत्वाच्या घोषणाही केल्या. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली. तसेच मतदारांसाठी कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत हेही त्यांनी जाहीर केली. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या सूचनाही केल्या.

2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

आगामी निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. तसेच निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

– ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.

– राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी.

– नेते आपल्या समर्थकांना त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर भिंती इत्यादींवर झेंडे लावण्याची, बॅनर लावण्याची, माहिती पेस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत.

– मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.

– मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू होईल.

– मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.

– विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नका. विद्वेष पसरवणारे वक्तव्य करू नका.

– कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करू नका.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.