पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात?

देशातील राजकीय नेते कोणते मोबाईल वापरतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. भारतातील नेते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मागे नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात?
Follow us
| Updated on: Jun 24, 2019 | 10:52 AM

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन-दोन स्मार्टफोन वापरतात. डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे ते ट्विटरला टाईपरायटरप्रमाणे वापरतात, असं मस्करीने म्हटलं जातं. देशातील राजकीय नेते कोणते मोबाईल वापरतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. भारतातील नेते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मागे नाहीत. नरेंद्र मोदी सरकारमधील अनेक प्रमुख मंत्री टेक-सेव्ही आहेत आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सक्रीय राहतात. यासठी ते Apple आणि अँड्रॉईडच्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सचा वापर करतात.

आयएनएस न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅजेट प्रेमी आहेत. ते Apple चे लेटेस्ट फोन्स आणि इतर डिव्हाईस वापरतात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ब्राण्ड न्यू Iphone XS वापरतात. मोदी आणि शाह हे दोघेही त्यांच्या कार्यकर्त्यांशी किंवा नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी, त्यांच्यापर्यंत आपली गोष्ट पोहोचवण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मोदींचे सध्या ट्विटरवर 4 कोटी 82 लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत. तर अमित शाह यांचे 1 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान हे अँड्रॉईड स्मार्टफोन आणि Iphone या दोघांचाही वापर करतात. तसेच, भाजपचे इतर प्रमुख नेतेही लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करतात.

नितीन गडकरी

महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कार्यालयातील रोजच्या कामांवर नजर ठेवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुक दोन्हीलाही पसंती देतात. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी, संपर्कात राहण्यासाठी ते ट्विटर आणि फेसबुकवर नेहमी सक्रीय असतात. गडकरींचे ट्विटर 51.5 लाख फॉलोअर्स आहेत.

निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशाबाबत सांगण्यासाठी, सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी, तसेच जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ट्विटरचा वापर करतात. सध्या त्यांचे ट्विटरवर 22.3 लाख फॉलोअर्स आहेत.

संबंधित बातम्या :

मोदींच्या पावलावर फडणवीसांचं पाऊल, भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवणार

मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार?

मोदी सरकारने ‘या’ 15 मोठ्या अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती घ्यायला लावली!

… म्हणून मोदी आणि पुतीन यांच्या बैठकीत अमेठीची चर्चा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.