कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे (WHO warninig about corona). लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे (WHO warninig about corona). लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाला नष्ट करण्यासाठी जगभरातील हजारो वैद्यानिक संशोधन करत आहेत. मात्र, हा कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही. उलट आपल्याला कोरोना विषाणूसोबत राहण्याची सवय करुन घ्यावी लागेल, असा धक्कादायक इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे (WHO warninig about corona).

“कोरोना विषाणू आता हवेतील इतर सर्वसामान्य विषाणूंप्रवाणे कायमस्वरुपी आपल्यासोबत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगायचं शिकून घ्यावं लागेल”, असं जागतिक आरोग्य संघटनेचे आणीबाणीविषयक कार्यक्रमाचे संचालक मिचेल रयान म्हणाले आहेत.

“कोरोना विषाणू नेमका कधी नष्ट होईल, याबाबत अजूनही काही ठोस अशी माहिती मिळालेली नाही. कदाचित तो HIV या विषाणूसारखा कधीच नष्ट होणारही नाही. आपल्याला वास्तव्याचा स्वीकार करायला हवा. HIV बाधित रुग्ण औषधांच्या आधारावर उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य जगू शकतो. तसंच आपल्याला कोरोनासोबत जगायचं शिकावं लागेल”, असं रयान यांनी सांगितलं आहे.

“कोरोनावर लस किंवा औषध निर्माण करणं ही एक मोठी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कधी पूर्ण होईल ते निश्चित नाही. कदाचित ही प्रक्रिया कधीच पूर्णही होणार नाही. याशिवाय लस जरी तयार झाली तरी संपूर्ण जगभरात लसवर टेस्टिंग केली जाईल”, असं मिचेल रयान यांनी सांगितलं

जगभरात 42 लाख कोरोनाबाधित

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 42 लाखांच्यावर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यापेक्षा दररोज वाढत आहे. कोरोनामुळे जगात आतापर्यंत 3 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना फोफावत चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 78 हजारवर पोहोचला आहे. यापैकी 2 हजार 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 26 हजार 235 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या भारतात 49 हजार 219 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown 4 | मोदींकडून लॉकडाऊन 4 ची घोषणा, ठाकरे सरकारकडून रणनीती आखण्यास सुरुवात (फाईल फोटो)

Published On - 3:16 pm, Thu, 14 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI