AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या महिलेने शेतातच दिला गोंडस कन्येला जन्म

रोजगारासाठी सोयाबीन काढणीला गेलेली पल्लवी निसडे ही गरोदर महिला शेतातच बाळंतीण झाल्याची घटना सोमवारी घडली. या महिलेने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. ही घटना मालेगाव तालुक्यातील शिरसळा गावात घडली. (Woman gave birth to child girl at farm in Shirsala Village)

सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या महिलेने शेतातच दिला गोंडस कन्येला जन्म
| Updated on: Oct 05, 2020 | 11:57 PM
Share

वाशिम : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यामुळे शेतात मजुरी करणाऱ्यांना थोडाफार रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगारासाठी सोयाबीन काढणीला गेलेली पल्लवी निसडे ही गरोदर महिला शेतातच बाळंतीण झाल्याची घटना सोमवारी घडली. या महिलेने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. ही घटना मालेगाव तालुक्यातील शिरसळा गावात घडली. (Woman gave birth to child girl at farm in Shirsala Village)

बाळांतपणासाठी पल्लवी निसडे माहेरी आल्या होत्या. पल्लवी निसडे ही महिला मानोरा तालुक्यातील असून ती मालेगाव तालुक्यातील शिरसळा येथील दत्तराव इंगोले याच्या शेतात सोयाबीन काढणीसाठी गेली होती. सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना पल्लवी निसडेंना प्रसुतीकळा सुरू झाल्या. निसडे यांच्या सोबत शेतात काम करत असणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच शिरपूर येथील आरोग्य केंद्रात माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिरसाळा येत शेतातच महिलांच्या मदतीने पल्लवी निसडे यांची प्रसुती केली. या घटनेने ग्रामीण भागात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला.

विदर्भामध्ये सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. सोयाबीन काढणीसाठी आलेल्या पल्लवी निसडे यांना प्रसुतीकळा आल्याने शेतातील गोठ्यात आणले. डॉक्टरांनी त्यांची प्रसुती केली. मात्र, राज्य सरकारने लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा , अशी विनंती असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी म्हटले. मागील चार,पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या काढणीला वेग आला आहे. मागील चार, पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या काढणीला वेग आला आहे.

अतिवृष्टीने 40 ते 45 टक्के सोयाबीनचे नुकसान

वाशिम जिल्ह्यात जवळपास 3 लाख हेक्टर वर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. बोगस सोयाबीनच्या बियाण्यांमुळे अनेकांना दुबार तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. त्यातून शेतकरी कसेबसे सावरत नाहीत तोच ऐन काढणीच्या हंगाम तोंडावर असताना सप्टेंबर महिन्यात सतत अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 40 ते 45 टक्के सोयाबीन खराब झाले आहे.

संबंधित बातम्या:

Rain Updates | वाशिम, चंद्रपूर, नांदेडमध्ये जोरदार पाऊस, खरिप पिकांना जीवदान

वाशिममध्ये पोवाड्यातून कोरोनाबाबत जनजागृती

(Woman gave birth to child girl at farm in Shirsala Village)

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...