नारळ पाणी पाजून बलात्कार, व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल, महिला ज्योतिषाचा अभिनेत्यावर आरोप

नारळ पाणी पाजून बलात्कार, व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल, महिला ज्योतिषाचा अभिनेत्यावर आरोप

मुंबई : टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने बलात्कार करुन, त्याचा व्हिडीओ तयार केला आणि मला ब्लॅकमेल करत आहे, अशी तक्रार महिला ज्योतिषाने केली आहे. शिवाय, या व्हिडीओची भिती दाखवून पैसे मागत असल्याचाही आरोप महिला ज्योतिषाने केला आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात महिला ज्योतिषाने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

2016 च्या ऑक्टोबर महिन्यात डेटिंग अॅप्लिकेशनवरुन अभिनेता आणि महिला ज्योतिषाची ओळख झाली. यानंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली. एक दिवस आरोपी अभिनेत्याने महिला ज्योतिषाला रुमवर बोलावलं आणि लग्नाचं वचन देत, बलात्कार केला. महिला ज्योतिषाने अशी तक्रार ओशिवारा पोलिस ठाण्यात केली आहे.

अभिनेत्याने नारळाचं पाणी पाजलं, त्यानंतर चक्कर आली. त्यानंतर त्याने बलात्कार करुन मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला, असा गंभीर आरोप महिला ज्योतिषाने केला आहे.

पीडित महिला ज्योतिषाने तक्रारीत पुढे म्हटलंय की, “मोबाईलमधील बलात्काराचा व्हिडीओ दाखवत, अभिनेता मला ब्लॅकमेल करुन पैसे उकलत होता. यादरम्यान मी लग्नासाठीही त्याला विचारत होते. मात्र, तो लग्नाचा विषय कायम टाळत राहिला. ज्यावेळी लग्नाचं सातत्याने मी विचारु लागले, त्याने धमकी देऊन म्हटलं की, तुला काय करायचं ते कर.”

दरम्यान, पीडित महिला ज्योतिषाने ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI