AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा आंघोळ, दाढी करत नसल्याने घटस्फोटासाठी अर्ज

भोपाळ (मध्य प्रदेश) : नवरा-बायको म्हटलं तर काही ना काही कारणांवरुन वाद होत असतात. नवरा-बायकोमध्ये होणारे वाद, मारहाण, सततची भांडणं यांसारख्या अनेक कारणांमुळे घटस्फोट झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येतात. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नवरा आंघोळ करत नाही, या कारणामुळे घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. या अनोख्या कारणामुळे सध्या जोडप्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा […]

नवरा आंघोळ, दाढी करत नसल्याने घटस्फोटासाठी अर्ज
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

भोपाळ (मध्य प्रदेश) : नवरा-बायको म्हटलं तर काही ना काही कारणांवरुन वाद होत असतात. नवरा-बायकोमध्ये होणारे वाद, मारहाण, सततची भांडणं यांसारख्या अनेक कारणांमुळे घटस्फोट झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येतात. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नवरा आंघोळ करत नाही, या कारणामुळे घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. या अनोख्या कारणामुळे सध्या जोडप्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा रंगली आहे.

भोपाळमधील या जोडप्याचं लग्न 2018 मध्ये झाले. लग्नावेळी तरुणाचं वय 25 तर तरुणी 23 वर्षांची होती. त्यांचं अरेंज मॅरेज असून मुलगा सिंधी, तर मुलगी ब्राह्मण आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या दोघांचाही सुखाचा संसार सुरु होता. मात्र काही महिन्यांपूर्वी विवाहितेला आपला नवरा आंघोळ करत नसल्याचे समजले. त्यानंतर तिने त्याला अनेकदा आंघोळ करण्यास बजावलं. मात्र तो विविध कारणं सांगत आंघोळ करण्यास टाळाटाळ करत होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये या विषयांवरुन टोकाचे वाद निर्माण झाले. या वादानंतर मुलीने कंटाळून भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक न्यायालयासमोर त्या दोघांनी आपपल्या बाजू मांडल्या. नवरा अंघोळ करत नसल्याने त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते असं कारण बायकोने न्यायाधीशांसमोर दिलं. तसेच त्याला आंघोळ करायला सांगितले, तर तो कपड्यांवर परफ्युम लावतो आणि बाहेर येतो. त्याच्या या आंघोळ न करण्याच्या सवयीला मी कंटाळले आहे. इतकेच नाही तर तो घरी आल्यानंतर सर्व वस्तू कुठेही पसरवून ठेवतो. विशेष म्हणजे तो कित्येक महिने दाढीही करत नाही. त्यामुळे मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे, असं तिने न्यायाधीशांसमोर सांगितलं.

यावर मुलाच्या आई-वडिलांनी सून खोटं सांगत असल्याचा दावा केला. आमच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिला आमच्या घरातील परंपरा, खाणे-पिणे या सर्व गोष्टी कित्येकदा सांगून समजत नव्हत्या. त्यामुळे तिला आमच्या घरात राहण्यास त्रास होत होता. म्हणूनच तिला आमच्या मुलापासून घटस्फोट हवा आहे, असा आरोप मुलाच्या आई-वडिलांनी केला.

भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयातील न्यायधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी त्या दोघांना तुम्हाला घटस्फोट हवा असल्यास 6 महिने वेगळे राहावे लागेल आणि त्यानंतरच तुमचा कायद्याने घटस्फोट होईल असे सांगितले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या