भ्रष्ट देशांची यादी जाहीर, भारत 78 व्या स्थानी, पाकिस्तान-चीन कितव्या स्थानी?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली: जगातील भ्रष्ट देशांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकल्यानंतर, भारताची स्थिती सुधारल्याचं दिसतं. 180 देशांच्या यादीत भारताने तीन पायऱ्यांनी सुधारणा करत 78 वं स्थान मिळवलं आहे. भारतापेक्षा रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 102 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सोमालिया हा जगातील सर्वात भ्रष्ट देश आहे. भ्रष्टाचारविरोधी मूल्यांकन संस्थेने जागतिक भ्रष्टाचार मूल्यांकन […]

भ्रष्ट देशांची यादी जाहीर, भारत 78 व्या स्थानी, पाकिस्तान-चीन कितव्या स्थानी?
Follow us on

नवी दिल्ली: जगातील भ्रष्ट देशांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकल्यानंतर, भारताची स्थिती सुधारल्याचं दिसतं. 180 देशांच्या यादीत भारताने तीन पायऱ्यांनी सुधारणा करत 78 वं स्थान मिळवलं आहे. भारतापेक्षा रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 102 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सोमालिया हा जगातील सर्वात भ्रष्ट देश आहे.

भ्रष्टाचारविरोधी मूल्यांकन संस्थेने जागतिक भ्रष्टाचार मूल्यांकन यादी 2018 जारी केली. या यादीत जगातील 180 देशांची नावं आहेत. पहिल्या स्थानी डेन्मार्क आहे, म्हणजेच या देशात भ्रष्टाचाराचं प्रमाण नगण्य किंवा कमी आहे. याच यादीत भारत 78 व्या क्रमांकावर असल्याने, भारतातील भ्रष्टाचाराबाबत अंदाज लावता येऊ शकतो. यापूर्वी 2017 मध्ये भारत या यादीत 81 व्या नंबरवर होता. म्हणजेच वर्षभरात थोडा का होऊन भ्रष्टाचार कमी झाल्याचं दिसून येतंय. पण ही सुधारणा अत्यंत कासवगतीची आहे. 2017 मध्ये भारताला 40 गुण मिळाले होते. यंदा त्यात एका अंकाची भर होऊन 41 गुण मिळाले.

चीन आणि पाकिस्तानची परिस्थिती गंभीर
भारताचं रँकिंग सुधारत असताना, चीन आणि पाकिस्तानची परिस्थिती मात्र गंभीर आहे. कारण भ्रष्ट देशांच्या या यादीत चीन 87 व्या स्थानी आहे. तर पाकिस्तान थोड्या थोडक्या नव्हे तर 117 व्या स्थानी आहे.

सोमालिया सर्वात भ्रष्ट
भ्रष्ट देशांच्या यादीत सोमालिया सर्वात अव्वल आहे. सोमालिया भ्रष्टाचाराने बोकाळल्याचं चित्र आहे. तर डेन्मार्कमध्ये भ्रष्टाचार कमी प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे. डेन्मार्कनंतर न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर, स्वीडन आणि स्वित्झर्लंड यांचा नंबर लागतो. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वात अमेरिकेची स्थिती बिघडत आहे. कारण या यादीत टॉप 20 देशांमध्ये असलेली अमेरिका आता 22 व्या स्थानी घसरलेली आहे. 2011 नंतर अमेरिका पहिल्यांदाच टॉप 20 देशांमधून बाहेर पडली आहे.