इम्रान खान जीवाची भीक मागत फिरतोय : योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM yogi adityanath) यांची दिल्लीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यावर सडकून टीका केली.

इम्रान खान जीवाची भीक मागत फिरतोय : योगी आदित्यनाथ
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 9:24 PM

नवी दिल्ली : “पूर्वीचं काँग्रेस सरकार पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरायचं. पाकिस्तानने पुलवाम्यात दहशतवाही हल्ला घडवून आणला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. त्यामुळे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आपल्याला घाबरला आहे. तो आता जीवाची भीक मागत फिरतोय”, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला (Uttar Pradesh CM yogi adityanath).

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM yogi adityanath) यांची दिल्लीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली.

“दिल्लीच्या विकासासाठी जे पैसे मंजूर होतात त्यांचा वापर विकास कामांसाठी केला जात नाही तर जे भारताविरोधी नारे देतात त्यांच्यासाठी वापरले जातात”, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.

“काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यामुळे ‘मोदी आहे तर शक्य आहे’, असं सिद्ध झालं आहे. काँग्रेस आणि केजरीवाल दगडफेक करणाऱ्यांचे समर्थन करत होते. आम्ही या दगडफेक करणाऱ्यांना यमलोकात पाठवायला सुरुवात केली. आम्ही अशा लोकांना बिर्याणी नाही तर गोळी खाऊ घालतो”, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.

योगी आदित्यनाथ यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. “जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या धोरणेला विरोध करतात तेच आंदोलन करत आहेत. काँग्रेस अयोध्येतील राम मंदिराला विरोध करत होते. तशाच प्रकारचा विरोध इंग्रज आणि मुघल करत होते. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर आता राम मंदिर बांधलं जात आहे”, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. प्रचारसभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दिल्लीत सर्वाधिक जागांवर सत्ता यावी, यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्यादेखील प्रचारसभा घेण्यात आल्या. आज (1 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यात आली. दिल्लीत एकीकडे विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे तर दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिल्लीतील काही भागांमध्ये आंदोलने केली जात आहेत. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकर येत्या 8 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात कुणाला निवडूण देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.