राज्यात स्वाईन फ्लूच्या आजारानं 302 जणांचा मृत्यू

राज्यात स्वाईन फ्लूच्या आजारानं 302 जणांचा मृत्यू

मुंबई- स्वाईन फ्लूच्या आजारानं सध्या राज्यात भितीचे वातवरण निर्माण झालं आहे. मागच्या 10 महिन्यांत तब्बल 2,375 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 302 जणांचा मृत्यू झालाय. तर 33 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती माय मेडिकल मंत्रा या संकतेस्थळावर देण्यात आली आहे.

गेले काही महिन्यांपासून स्वाईन फ्लूनं राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं संपुर्ण राज्यात भितीचे वातावरण दिसत आहे. यामध्ये 2375 जणांना या आजाराची लागण झाली होती तर त्यातील 1,775 लोकांना उपचार करुन सोडून देण्यात आलय. तर यातील 33 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणं

ताप, घसा खवखवणं, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलट्या, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येण.

स्वाईन फ्लूवर प्रतिबंध कसा कराल

सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं, खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा, नाक आणि तोंडावर मास्क बांधावा, सतत साबणाने हात धुणे, भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्यावा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI