AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या देशात पिकवले जातात ‘हे’ 5 प्रकारचे तांदूळ, पोषण तत्वांचा आहे खजिना

आपल्या देशात पांढरा तांदूळ खूप खाल्ला जातो, परंतु उच्च कार्बोहायड्रेट्स, उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो फारसा आरोग्यदायी मानला जात नाही, म्हणून आज आपण या लेखात आपल्या भारतात पिकवले जाणाऱ्या पाच प्रकारच्या तांदळांविषयी जाणून घेऊ जे पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.

आपल्या देशात पिकवले जातात 'हे' 5 प्रकारचे तांदूळ, पोषण तत्वांचा आहे खजिना
5 nutrition rich rice Varieties in indiaImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jul 25, 2025 | 2:51 PM
Share

आपल्या देशात पांढऱ्या तांदळाचे सेवन खूप जास्त केले जाते. अशातच बहुतेक आरोग्य तज्ञ सांगतात की पांढरा तांदूळ हा आहारात खूप कमी प्रमाणात समाविष्ट करावा. कारण पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सुमारे ७० ते ९० इतका जास्त आहे. तसेच यामध्ये कमी पोषक तत्वे देखील असतात आणि साधे कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. अशातच ज्या लोकांना आधीच मधुमेह आहे त्यांनी विशेषतः पांढरा तांदूळ खाणे टाळावे, अन्यथा रक्तातील साखर वाढू शकते. यासाठी पांढऱ्या तांदळाव्यतिरिक्त आपल्या देशात अनेक प्रकारचे तांदूळ पिकवले जातात. तर आजच्या या लेखात, आपण अशा 5 प्रकारच्या तांदळांविषयी जाणून घेऊ जे पोषक तत्वांनी समृद्ध असून त्यांच्यात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण देखील कमी आहे.

उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रत्येकाच्या आहारात भाताचा समावेश हा असतोच असतो. कारण भात हा पचायला सोपा आहे. मात्र पांढऱ्या भातात फायबर आणि काही पोषक घटक कमी प्रमाणात आढळते. तर हा भात ग्लूटेन-मुक्त अन्न आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात ऊर्जा देखील प्रदान करते. मात्र आहारतज्ञ हा भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. चला तर मग आज आपण पौष्टिकतेने समृद्ध भाताचे प्रकार जाणून घेऊया.

काळा तांदूळ

भारतातील ईशान्येकडील असलेले राज्यं मणिपूर आणि आसाममध्ये काळा तांदूळ पिकवला जातो. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या काळ्या तांदळाला तेथे “चाक हाओ” असे म्हणतात. तर या तांदळाचा तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. काळा किंवा खूप गडद जांभळा रंगाचा तांदूळ असतो. तर या तांदळाचा असलेला काळा रंग अँथोसायनिन नावाच्या अँटिऑक्सिडंटपासून येतो. या तांदळाच्या सेवनाने मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते.

लाल तांदूळ

केरळ किंवा तामिळनाडूसारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये लाल तांदूळ पिकवला जातो. तर त्या भांगामध्ये याला “बाओ-धान” असेही म्हणतात. ही तांदळाची एक अतिशय लोकप्रिय जात आहे आणि बाजारात सहज उपलब्ध आहे. उत्तरकाशी आणि बागेश्वरमध्येही या लाल तांदळाचे पिक घेतले जाते. तर तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रण आणि वजन कमी करण्यासाठी हा तांदूळ फायदेशीर मानला जातो.

नवारा भात

भारतात आढळणाऱ्या विविध तांदळाच्या जातींपैकी, नवारा तांदूळ हा देखील एक असा प्रकार आहे जो अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. या तांदळाचा वापर आरोग्यासाठी केला जातो. त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात, म्हणून ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानले जाते. तर या नवारा तांदळाला शास्तिक शाली असेही म्हणतात.

काळे जिरे भात

तांदळाच्या जातींबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही पांढऱ्याऐवजी काळ्या जिऱ्याचा तांदूळ तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. याला कोरापूट काळे जिरे तांदूळ असेही म्हणतात. हे तांदूळ त्यांच्या सुगंध आणि आश्चर्यकारक चवीसाठी ओळखले जातात आणि त्यांचा रंग काळा असतो आणि ते लहान जिऱ्यासारखे दिसतात. ओडिशातील कोरापूटमध्ये हा तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट