
जर तुम्ही पहिल्यांदाच पंचतारांकित म्हणजे हॉटेलमध्ये जात असाल तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. खरंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल माहितीही नसते, जसे की कोणत्या गोष्टी कशा वापरायच्या. जर आपण इकत्या मोठ्या हॉटेलची संस्कृती जाणून घ्यायची असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं असतं. जेणेकरून अडचणी येणार नाहीत.
जर तुम्ही पंचतारांकित हॉटेलला भेट दिली तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
योग्य पोशाख घाला
जर पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं असेल तर योग्य तो पोशाख घालणे खूप महत्वाचे आहे. चांगले कपडे परिधान केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. मुळात हे कपडे महागडे किंवा ब्रांडेड असावेत असं काही नाही पण किमान ते स्वच्छ आणि सोबर असावेत. झगमगते किंवा बटबटीत रंगाचे कपडे घालणे शक्यतो टाळावे.
टिपिंग संस्कृतीकडे लक्ष द्या
शक्य असल्यास, संधी मिळेल तेव्हा कर्मचाऱ्यांना टिप देण्याचा प्रयत्न करा. बहुतेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये टिपिंग संस्कृती असते. हॉटेल बिलात टिप्स समाविष्ट होत नाहीत, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे करू शकता. त्यात कोणतीही जबदस्ती नसते. फक्त 5 स्टार हॉटेलमधील एखाद्या कर्मचाऱ्यास टिप द्यायची असल्यास ती किमान 100 रुच्यांपुढे आणि 500 रुपयांपर्यंत असावी. त्याहीपेक्षा जास्त रक्कम नसावी.कारण बऱ्याचदा तो शिष्टपणाचे दिसते.
शिष्टाचार नियमांबद्दल माहिती
जर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचे असेल तर तुम्हाला तिथल्या शिष्टाचाराचे नियम आणि जेवणाचे नियम, पदार्थ तसेच त्यांची किंमत माहित असायला हवी.
कटलरी कशी ठेवावी?
पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवताना कटलरी कशी ठेवावी यासारख्या गोष्टी देखील माहित असायला हव्यात.जेवण संपल्यावर कटलरी म्हणजे चमचा, फोक ( काटा चमचा), किंवा चाकू टेबलवरील प्लेटच्या उजव्या बाजूला एकत्र करून ठेवावी. हा नियम विशेषतः औपचारिक जेवणांसाठी लागू आहे, जिथे कटलरीची योग्य व्यवस्था करणे हे शिष्टाचाराचा भाग मानले जाते.
कर्मचाऱ्यांकडून कोणती माहिती घेणे गरजेचं
तुम्ही ज्या हॉटेलमध्ये किंवा खोलीत राहत असाल तर त्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कर्मचाऱ्यांना विचारू शकता. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना, तुमच्या गरजा आणि सोयी लक्षात घेऊन, कर्मचाऱ्यांकडून योग्य माहिती मिळवणे अपेक्षित आहे. व्यवस्था करणे हे शिष्टाचाराचा भाग मानला जातो. जसं की, खोलीत कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, जसे की वाई-फाई, टीव्ही, मिनीबार, आणि इतर?, तसेच हॉटेलमध्ये काय नियम आहेत, जसे की चेक-इन आणि चेक-आउटचा नियम, पाहुण्यांसाठीचे नियम आणि इतर? तसेच
पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना, आपण कर्मचाऱ्यांशी नम्रतेने बोलणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या मदतीसाठी त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे.