AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरूममध्ये ठेवलेल्या या 6 गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक; आजच फेकून द्या

बाथरूम आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असला तरी, काही सामान्य वस्तू आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा काही बाथरूममधील वस्तू आहेत ज्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या वस्तूंमुळे बॅक्टेरियाचा प्रसार होऊन त्वचेचे आजार, श्वसन समस्या आणि इतर आजार होण्याचा धोका वाढतो. जर तुमच्याही बाथरूममध्ये अशा गोष्टी असतील तर त्या ताबडतोब फेकून द्या.

बाथरूममध्ये ठेवलेल्या या 6 गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक; आजच फेकून द्या
6 Bathroom Items Out Today They Might Be Silent KillersImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 11, 2025 | 2:50 PM
Share

बाथरूम हा आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, जिथून आपण आपला दिवस सुरू करतो आणि स्वतःला ताजेतवाने करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बाथरूममध्ये ठेवलेल्या काही सामान्य गोष्टी तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात? हो, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाथरुममधील काही दैनंदिन वापरातील गोष्टी हळूहळू ‘सायलेंट किलर’ बनू शकतात.

बाथरूममधील काही गोष्टी आरोग्याला हानी पोहचवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते आपण अशा अनेक वस्तू बाथरूममध्ये महिनोनमहिने ठेवतो आणि वापरतो ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहचू शकते. अशा गोष्टींमुळे केवळ त्वचेचे आजारच नाहीत तर सायनस, ऍलर्जी आणि श्वसनाच्या समस्या देखील होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते बाथरूममध्ये ठेवलेल्या अशा 6 सामान्य वस्तूंबद्दल सांगणार आहोत. ज्या ताबडतोब फेकून देणे गरजेच्या असून त्यामुळे स्वतःला आजारांपासून वाचवू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणत्या गोष्टी आहेत.

या 6 वस्तू ताबडतोब बाथरूममधून बाहेर फेकून द्या

3 महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश : 3 महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश बॅक्टेरियांचे घरच असतो. बाथरूममधील ओलावा आणि टॉयलेट फ्लशमधील जंतू ब्रशच्या ब्रिसल्समध्ये जमा होतात. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही त्याच ब्रशने दात स्वच्छ करता तेव्हा बॅक्टेरिया थेट तोंडात जातात, ज्यामुळे तोंडात अल्सर, तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की टूथब्रश दर 2 ते 3 महिन्यांनी बदलावा आणि ब्रश नेहमी झाकून तसेच कोरड्या जागी ठेवावा.

ओला टॉवेल : बाथरूममध्ये नेहमी ओले टॉवेल लटकवणे त्वचेसाठी हानिकारक असते. ओल्या कपड्यांमध्ये बुरशी आणि बॅक्टेरियाची वाढ वेगाने होते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो . विशेषतः जर एकापेक्षा जास्त व्यक्ती टॉवेल वापरत असतील तर संसर्ग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. दररोज उन्हात टॉवेल वाळवणे आणि आठवड्यातून दोनदा धुणे चांगले.

जुना लूफा: जुना लूफा म्हणजे मृत त्वचेचा आणि बॅक्टेरियाचा थरत असतो. शरीर स्वच्छ करण्यासाठी लूफा वापरला जातो, परंतु जेव्हा तोच लूफा अनेक आठवडे वापरला जातो तेव्हा मृत त्वचा, ओलावा आणि साबणाचे कण त्यात जमा होतात आणि बॅक्टेरिया आणि बुरशीला आमंत्रण देऊ लागतात. यामुळे त्वचेचा संसर्ग, पुरळ आणि खाज येऊ शकते. तज्ञांच्या मते, लूफा दर 3 आठवड्यांनी बदलला पाहिजे आणि वापरल्यानंतर तो पूर्णपणे वाळवणे महत्वाचे आहे.

पीव्हीसी शॉवर पडदे: पीव्हीसीपासून बनवलेले शॉवर पडदे सुंदर दिसू शकतात, परंतु त्यातून बाहेर पडणारे फॅथलेट्ससारखे रसायने गरम पाणी आणि वाफेच्या संपर्कात आल्यावर हवेत विरघळतात. जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा ही रसायने श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात. यामुळे हार्मोनल असंतुलन, ऍलर्जी, श्वसन समस्या उद्भवू शकतात आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून, पीव्हीसीऐवजी कापसाचे किंवा पर्यावरणपूरक मटेरियलचे बनलेले पडदे वापरणे चांगले.

कडून शेव्हिंग रेझर: बाथरूममध्ये शेव्हिंग रेझर जास्त काळ ठेवणे धोकादायक ठरू शकते. ओलाव्यामुळे रेझर ब्लेड लवकर गंजतो आणि त्यावर बॅक्टेरिया देखील वाढू लागतात. अशा रेझरने शेव्हिंग केल्याने त्वचेवर जखमा होऊ शकतात आणि संसर्ग पसरू शकतो. वापरल्यानंतर रेझर पूर्णपणे धुवा आणि वाळवा आणि दर 5 ते 7 वापरानंतर नवीन रेझर वापरा.

जुने शॉवर हेड: कालांतराने शॉवर हेडच्या छिद्रांमध्ये गंज पकडतो आणि बॅक्टेरिया जमा होतात. यामध्ये मायकोबॅक्टेरियम एव्हियम सारखे बॅक्टेरिया असतात जे श्वास घेतल्यावर शरीरात प्रवेश करतात आणि फुफ्फुसांच्या संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. जर तुम्ही शॉवर हेड स्वच्छ केले नाही तर ते आरोग्यासाठी धोका बनू शकते. तज्ज्ञांच्या मते, शॉवर हेड दर 6-12 महिन्यांनी स्वच्छ करावे किंवा बदलावे.

(डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Follow Us
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी