AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य आणि चवीचा खजिना; घरी बनवा शुद्ध नारळाचे दूध,जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी

जी लोकं दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळतात त्यांच्यासाठी चवीच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घरी बनवलेले ताजे नारळाचे दूध हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण घरच्या घरी नारळाचे दूध बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात.

आरोग्य आणि चवीचा खजिना; घरी बनवा शुद्ध नारळाचे दूध,जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी
| Edited By: | Updated on: Aug 30, 2026 | 3:01 PM
Share

तुम्ही शाकाहारी (Vegan) किंवा जी लोकं डेअरी-फ्री आहार घेत असाल तर बाजारातील महागडे आणि प्रक्रिया केलेले दुधाचे पर्याय घेण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेले नारळाचे दूध एक उत्तम पर्याय ठरू शकते. चव, पोषण आणि नैसर्गिकतेचा विचार केला तर ताजे नारळाचे दूध एक फायदेशीर पर्याय ठरेल.

हे केवळ चविष्ट आणि गोडच नाही, तर घरी बनवणे अगदी सोपे आहे. चला, याचे काही आश्चर्यकारक फायदे आणि ते बनवण्याची सर्वात सोपी पद्धत जाणून घेऊयात.

घरगुती नारळाचे दुध आरोग्यासाठी फायदेशीर का आहे?

नारळाचे दूध हे केवळ एक साधे पेय नाही, तर ते पोषक तत्वांचा खजिना आहे. त्याचे हे प्रमुख फायदे जाणूनही तुम्ही व्हाल थक्‍क:

लॅक्टोज-मुक्त: ज्यांना गायीचे किंवा म्हशीचे दूध पचायला त्रास होतो किंवा ज्यांना गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी नारळाचे दूध एक उत्तम पर्याय आहे. हे पचायला खूप हलके असते.

आरोग्यदायी फॅट्स: नारळाच्या दुधामध्ये असलेले चांगले फॅट्स तुमचे हृदय निरोगी ठेवते आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते.

चमकदार त्वचा आणि केस: नारळात जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमची त्वचा आतून चमकदार होते आणि केस मजबूत होतात.

वजन नियंत्रण: नारळाच्या दूधाच्या सेवनाने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे तुम्ही अनावश्यक पदार्थ खाणे टाळता.

घरी नारळाचे दूध बनवण्याची सोपी रेसिपी

बाजारातून नारळाचे दूध विकत आणण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या फक्त दोन घटकांचा वापर करून तुम्ही ते घरीच बनवू शकता.

1 ताजा नारळ (साल काढून त्याचे तुकडे केलेले किंवा किसलेला)

2 ते 3 कप कोमट पाणी

नारळाचे दूध बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एक ताजा नारळ घ्या आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. तुम्हाला हवे असल्यास नारळाचा बाहेरील कठीण तपकिरी भाग काढून टाकू शकता. त्यामुळे तयार होणारे नारळाचे दूध अधिक पांढरे दिसेल.

आता हे तुकडे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाका आणि त्यात 1 ते 1.5 कप कोमट पाणी टाका. कोमट पाण्यामुळे नारळातील सर्व तेल आणि दूध काढण्यास मदत होते.

नारळ पूर्णपणे बारीक होईपर्यंत वाटून घ्या.

एका पातेल्यावर स्वच्छ सुती कापड किंवा बारीक चाळणी ठेवा. नारळाचे वाटलेले मिश्रण त्या कापडात ओता आणि ते घट्ट पिळून घ्या. त्यातून बाहेर पडणारे घट्ट, मलईदार दूध हे तुमचे शुद्ध, फर्स्ट-एक्स्ट्रॅक्ट नारळाचे दूध आहे.

उरलेला नारळाचा कीस परत मिक्सरमध्ये टाका, त्यात थोडे गरम पाणी टाका आणि ही प्रक्रिया पुन्हा करा. यामुळे तुम्हाला थोडे पातळ दूध मिळेल, जे आमटी आणि सूप बनवण्यासाठी उत्तम असते.

त्याचा वापर कसा करायचा?

तुम्ही हे ताजे घरी बनवलेले नारळाचे दूध अनेक प्रकारे वापरू शकता:

तुमच्या सकाळच्या स्मूदी किंवा ओट्समध्ये मिसळा.

दुग्धजन्य पदार्थांशिवाय चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी वापरा.

दक्षिण भारतीय पदार्थांची किंवा थाई करीची चव आणि घट्टपणा वाढवण्यासाठी त्यात नारळाच्या दूधाचा वापर करा.

तुम्ही त्यात साखर टाकून ते तसेच सेवन करू शकता.

या घरगुती नारळाच्या दुधात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत, त्यामुळे ते एका हवाबंद बाटलीत फ्रिजमध्ये ठेवा आणि 3 ते 4 दिवसांच्या आत वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती