AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसी लावलेल्या रूममध्ये पाण्याचे भांडे ठेवल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात?

एसी रूममध्ये पाण्याचा भांडे ठेवल्याने रुममधील वातावरणात आणि त्वचेवर नक्की काय परिणाम होतात. त्वचेसाठी किंवा आपल्या शरीरासाठी खरंच हे फायदेशीर ठरतं का? चला तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

एसी लावलेल्या रूममध्ये पाण्याचे भांडे ठेवल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात?
AC Room & Water Bowl, Does it Help or Harm,Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2025 | 1:57 PM
Share

आजकाल असं एकही घर सापडणार नाही जिथे एसी नाहीये. हळू हळू सर्वांनाच एसीची सवय होऊ लागली आहे. विशेषत: शहरात तर एसीची आवश्यकता असतेच. पण अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की एसी रूममध्ये पाण्याचे भांडे ठेवावे का? काही लोक म्हणतात की यामुळे खोलीतील आर्द्रता वाढते आणि त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवता येते. आजकाल असे दिसून येते की लोक त्यांच्या एसी रूममध्ये एक ग्लास किंवा एक छोटी बादली भरून पाणी ठेवतात, पण खरोखर यामुळे फायदा होतो का? जाणून घेऊयात.

एसी रूममध्ये एक ग्लास किंवा एक छोटी बादली भरून पाणी ठेवणे खरंच फायदेशीर?

उन्हाळ्यात एसीची थंड हवा खूप आराम देते, पण एसीची हवा तुमच्या त्वचेसाठी तितकीशी हानिकारकही असते. खरंतर, जेव्हा तुम्ही बंद खोलीत जास्त वेळ एसी चालवता तेव्हा खोलीतील हवेतील नैसर्गिक ओलावा हळूहळू नाहीसा होतो. यामुळे हवा कोरडी होते आणि ही कोरडी हवा तुमच्या त्वचेवर परिणाम करते. त्वचा कोरडी, निर्जीव आणि ताणलेली वाटू लागते. कधीकधी ओठ फुटू लागतात आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा देखील येऊ शकतो.

पाण्याचे भांडे ठेवल्याने काय होते?

आता प्रश्न असा पडतो की खोलीत पाण्याचे भांडे ठेवल्याने ओलावा परत येऊ शकतो का? या संदर्भात, दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे डॉ. निखिल मेहता म्हणतात की “जर तुम्ही एसी रूममध्ये पाण्याने भरलेले भांडे ठेवले तर खोलीत काही प्रमाणात ओलावा राहील. यामुळे हवेत काही प्रमाणात ओलावा येतो, परंतु ही पद्धत फार फायदेशीर आहे असे अजिबात नाही. वैद्यकीय शास्त्रात असे कोणतेही पुरावे नाहीत की अशा प्रकारे एसीमध्ये पाण्याचे भांडे ठेवल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. हा पण काही प्रमाणात आराम मिळू शकतो. परंतु लक्षात ठेवा की हा उपाय फक्त मर्यादित पातळीवरच काम करतो. जर तुमची खोली मोठी असेल किंवा एसी बराच वेळ चालू असेल, तर फक्त पाण्याचे भांडे ठेवल्याने फारसा फरक पडणार नाही. तुम्हाला तुमच्या खोलीत ह्युमिडिफायर वापरावे लागेल.”

यामुळे काही नुकसान होऊ शकते का?

दिल्ली एम्समधील औषध विभागाचे डॉ. नीरज निश्चल म्हणतात की खोलीत पाण्याचे भांडे ठेवण्याने थेट नुकसान होत नसले तरी, जर तुम्ही ते पाण्याचे भांडे तसेच काही दिवस ठेवले आणि ते स्वच्छ केले नाही किंवा त्यातील पाणी बदलले नाही तर त्यात डासांची पैदास होऊ शकते. विशेषतः पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात डासांचा धोका वाढतो. म्हणूनच, जर तुम्हाला ही पद्धत अवलंबायची असेल तर लक्षात ठेवा की दररोज पाणी बदलले पाहिजे आणि भांडे स्वच्छ ठेवले पाहिजे.

AC मुळे त्वचा कोरडी होऊ नये म्हणून काय करावे?

मॉइश्चरायझर लावा : सकाळी आणि रात्री चांगले मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून त्वचा ओलसर राहील

भरपूर पाणी प्या : शरीराला डिहायड्रेट होऊ देऊ नका. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या

ह्युमिडिफायर वापरा : जर तुम्हाला खोलीत योग्य प्रमाणात आर्द्रता हवी असेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले ह्युमिडिफायर वापरू शकता. ते पाण्याच्या भांड्यापेक्षा जास्त प्रभावी आहे

चेहऱ्यावर मिस्ट स्प्रे करा : वेळोवेळी चेहऱ्यावर वॉटर-बेस्ड मिस्ट स्प्रे करा, यामुळे त्वचा ताजी आणि हायड्रेट राहील

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.