
अनेकदा बनवताना जेवण जास्त होतं तेव्हा बरेचजण उरलेले अन्न रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि भूक लागल्यावर ते पुन्हा गरम करून खातात. तसेच काहीजण वेळेआभावी देखील सकाळी जास्त जेवण तयार करून ठेवतात. आणि संध्याकाळी ते गरम करून खातात. आणि जवळपास हे सर्वांच्याच घरी असतं. विज्ञानाच्या दृष्टीने उरलेले अन्न पुन्हा गरम करून खाल्ले जाऊ शकते पण याबाबत आयुर्वेदाचा वेगळा दृष्टिकोन आहे.
आयुर्वेदानुसार, उरलेले अन्न खाऊ नये कारण त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदानुसार सकाळचे अन्न देखील रात्री खाऊ नये अन्यथा ते विषाप्रमाणे काम करू शकतं. सकाळी बनवलेले रात्रीचे जेवण आणि रात्री उरलेले जेवण पुन्हा दुसऱ्या दिवशी गरम करून खाणे का टाळावे याची कारणे आयुर्वेदात सांगितली आहेत. चला जाणून घेऊयात.
ताजे अन्न पौष्टिक आणि आरोग्यदायी असते.
ताजे तयार केलेले अन्न हे आरोग्यदायी पोषक तत्वांनी समृद्ध असते. तथापि, शिळे अन्न त्याचे पौष्टिक मूल्य गमावते. जास्त काळ साठवलेले अन्न ऊर्जा देत नाही तर त्याऐवजी आळस वाढवतो. आयुर्वेदानुसार, अन्न शिजवल्यानंतर ते जास्त वेळ न ठेवता ते किमान 1 ते 3 तासांच्या आत खावे. कारण जेवण बनवल्यानंतर एवढ्याच काळामध्ये ते अन्न पूर्णत: ताजे असते. म्हणून ते त्या वेळेतच खाल्ले पाहिजे.
जर तुम्हाला कधी आधी शिजवलेले अन्न खावे लागले तर ते खराब होऊ नये म्हणून तुम्ही ते योग्यरित्या साठवले पाहिजे. आयुर्वेदानुसार, बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्यासाठी आणि ते खाण्यायोग्य राहावे यासाठी पूर्व शिजवलेले अन्न साठवताना व्हॅक्यूम पॅकिंग किंवा हीट इंसुलेशन हे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा.
शिळे अन्न शरीरात असंतुलन निर्माण करते
आयुर्वेदानुसार, उरलेले अन्न खाल्ल्याने विविध दोष आणि पचन समस्या उद्भवू शकतात. वात, पित्त आणि कफ या तीन मुख्य दोषांपैकी वात पचनसंस्थेशी जवळून जोडलेले आहे आणि शिळे अन्न खाल्ल्याने असंतुलन निर्माण होऊ शकते. उरलेल्या अन्नात जंतू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात. शिवाय, उरलेल्या अन्नाचे पौष्टिक मूल्य कमी होते. म्हणून, स्वयंपाक केल्यानंतर एक किंवा तीन तासाच्या आत उरलेले अन्न खाणे हे तुमच्या शरीरासाठी सर्वोत्तम अन्न आहे. शक्यतो गरम अन्न खाणे फायदेशीर असते.
तुम्ही जे खाता तेच तुम्ही आहात
योग आणि आयुर्वेदाचे सर्व समर्थक म्हणतात की अन्नाची गुणवत्ता तुमचा स्वभाव ठरवते. ताजे, निरोगी आणि सात्विक अन्न खाल्ल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहते. शिळे, जंक आणि तामसिक अन्न खाल्ल्याने तुमचा स्वभावही तसाच होतो. ज्यामुळे आळस आणि राग वाढतो. म्हणून, नेहमी ताजे आणि गरम अन्न खाणे महत्वाचे आहे.