Air Purifying Plants: प्रदूषणाच्या पातळीत खूप वाढ, हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पती, ‘ही’ झाडे तुमच्या घरी असलीच पाहिजे
Air Purifying Plants: वायू प्रदूषणामुळे दमा आणि ॲलर्जीसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः शहरी भागांमध्ये धूळ प्रचंड असते आणि आता दिवाळी नंतर वायू प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. अशात घरात 'ही' 5 झाडं फक्त तुमच्या घराची शोभा वाढवणार नाही तर, हवा देखील शुद्ध ठेवेस..

Air Purifying Plants : मुंबई सारख्या शहरांमध्ये घर फार लहान असतात. अशात झाडं कुठे लावायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण काही झालं अशी आहेत ते तुमच्या घरातील हवा शुद्ध ठेऊ शकतात. संगायचं झालं तरस घरातील झाडं घराचं सौंदर्य वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय, घराभोवती झाडं लावून तुम्ही स्वच्छ हवा देखील मिळवू शकता. आजच्या काळात प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे, ज्यामुळे हवेची गुणवत्ताही खालावत आहे. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ब्राँकियल अस्थमा, इंटरस्टिशियल लंग डिसीज यांसारखे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, स्वच्छ हवा मिळवण्यासाठी तुम्ही घरी यापैकी काही इनडोअर प्लांट्स लावू शकता. ही झाडे केवळ हवा शुद्धच करत नाहीत, तर ताजी हवा देखील देतात.
सुपारीचं झाड: हवा शुद्ध करणाऱ्या सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक आहे. ही घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते. सुपारीची वनस्पती केवळ घराचे वातावरण सुंदर बनवत नाही, तर ती हवा देखील शुद्ध करते. मुख्यत्वे, ही वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड आणि फॉर्मल्डिहाइडसारखे हानिकारक वायू शोषून घेऊन हवा शुद्ध करते.
मनी प्लांट: मनी प्लांट, जे घरात आणि घराबाहेर सहजपणे वाढवता येते, ते हवा शुद्ध करण्याचे कामही करते. हे झाड तुम्हाला स्वच्छ हवा पुरवतं. ते हवेतील विषारी वायू शोषून घेतं आणि ताजा ऑक्सिजन बाहेर सोडतं.
पीस लिली: पीस लिली हे एक सुंदर घरातील रोप आहे. आपल्या हिरव्या पानांनी आणि पांढऱ्या फुलांनी, लिली केवळ घराचंच सौंदर्य वाढवत नाही, तर हवा देखील शुद्ध करते. हे रोप वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करते. हे रोप हवेतील कार्बन मोनॉक्साईड आणि इतर विषारी वायू शोषून घेऊन हवा शुद्ध करतं.
झेड वनस्पती: झेड वनस्पती उत्कृष्ट हवा शुद्ध करणारं म्हणूनही काम करतात, ज्यामुळे घरातील हवा स्वच्छ राहते. त्या रात्री ऑक्सिजन सोडतात, त्यामुळे तुम्ही त्यांना हॉल आणि बेडरूममध्ये ठेवू शकता. त्या आपल्याला धूळ आणि ॲलर्जीकारक घटकांपासूनही वाचवतात.
स्नेक वनस्पती: वनस्पती हवेतील हानिकारक प्रदूषकांना गाळण्यात प्रभावी आहे. ती हवेतील कार्बन मोनॉक्साईड, मिथेन आणि सल्फर शोषून घेते, त्यामुळे हवा शुद्ध होते.
स्पायडर प्लांट: ही वनस्पती हवेतील हानिकारक आणि प्रदूषणकारी पदार्थ काढून टाकतं. एवढंच नाही तर ती स्वच्छ हवा देखील पुरवते. ही वनस्पती हवेतील झायलीन, बेम्बिन, फॉर्मल्डिहाइड आणि कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी वायू शोषून हवा शुद्ध करते.
रबर प्लांट: हे झाड केवळ हवाच शुद्ध करत नाही, तर लाकडी फर्निचरमधून बाहेर पडणाऱ्या फॉर्मल्डिहाइड या हानिकारक सेंद्रिय संयुगापासून पर्यावरणाला मुक्त ठेवण्याची क्षमताही त्यात आहे. त्यामुळे, हे रबर प्लांट लाकडी टेबल, सोफा किंवा पलंगाजवळ ठेवा.
