ओव्याची वाफ घ्या आणि सर्दीला गुडबाय बोला !

| Updated on: Apr 13, 2021 | 11:48 AM

ओवा हा आपल्या स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात.

ओव्याची वाफ घ्या आणि सर्दीला गुडबाय बोला !
ओवा
Follow us on

मुंबई : ओवा हा आपल्या स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि किंचित तुरट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, सर्दी झाल्यावर ओव्याच्या पाण्याची वाफ घेतली तर सर्दी दूर होण्यास मदत होते. (Ajwain is beneficial for health)

कोरोनाच्या या वातावरणात अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण ओव्याच्या पाण्याची वाफ घेतली तर सर्दीची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन चमचे ओवा आणि एक ग्लास गरम पाणी घ्यावे लागणार आहे. या गरम पाण्यात ओव्या मिक्स करा आणि वाफ घ्या यामुळे तुम्हाला बरे वाढेल. दिवसातून चार ते पाच वेळा आपण असे केले तर सर्दीची समस्या दूर होईल.

काही लोकांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात. ओवा केस अकाली पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे नियमित सेवन केल्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाहीत. जर मायग्रेनमुळे वेदना होत असतील, तर ओव्याची पावडर एका पातळ कपड्यात बांधून तिचा सतत वास घेतल्याने वेदनेपासून आराम मिळेल.

ज्या लोकांना दम्याचा आजार आहे, त्यांनी दिवसातून कमीत कमी एक चमचे ओवा खायला हवा. ओव्यामध्ये शरीरातील पेशींचा दाह कमी करणारे अँटी-इन्फ्लेमेशन गुणधर्म आहेत. यामुळे, आपल्याला श्वसन समस्येमध्ये आराम मिळेल. संधिवातामुळे वेदना होत असल्यास, ओव्याची पुरचुंडी तयार करून त्या भागावर शेक द्या. अर्धा कप पाण्यात ओवा उकळवा आणि त्यात सुंठ मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे संधिवातात खूप आराम मिळेल.

संबंधित बातम्या : 

(Ajwain is beneficial for health)