कोरफड केवळ त्वचा, केसांसाठीच फायदेशीर नाही, तर शरीरातील इतर आजारांसाठी होतो तिचा फायदा

| Updated on: Feb 18, 2022 | 11:29 PM

कोरफड ही इतकी फायदेशीर असते की, तुमच्या शरीरातील विषारी घटक ती बाहेर काढण्याचे काम करत असते. वाढलेले वजन जर तुम्हाला कमी करायचे असेल तर दररोज एक चमचा आवळ्याचा रस आणि दोन चमचे कोरफडीचा रस कोमट पाण्यातून घ्या त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कोरफड केवळ त्वचा, केसांसाठीच फायदेशीर नाही, तर शरीरातील इतर आजारांसाठी होतो तिचा फायदा
Follow us on

 

मुंबईः कोरपड (Aloe Vera) म्हणजेच एलोवेराचा वापर लोक आपल्या सौंदर्यासाठी जास्त करतात. मात्र कोरपड ही वनस्पती सगळ्यात जास्त वनौषधी वनस्पती आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक रोगांवर कोरपडचा उपयोग होऊ शकतो. त्या कोरपडचाच फायदा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कित्येक शतकांपासून कोरपडचा वापर फक्त सौंदर्यासाठीच केला जातो. आयुर्वेदामध्ये (Ayurveda) त्याला घृतकुमारी म्हणून त्याला ओळखले जाते. त्यामुळे आजही त्याचा फायदा माहिती असणारे लोक सौंदर्यासाठी वापर करतातच पण त्याच बरोबर त्याचा वापर इतर रोगांवरही केला जातो.

गेल्या काही काळापासून कोरपडचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, ही वनस्पती प्रत्येकाच्या घराघरामध्ये मिळू शकते. (Aloe Vera Benefits) पण तुम्हाला माहिती आहे का की याचा वापर फक्त सौंदर्यासाठीच नाही तर अनेक समस्या सोडवण्यासाठी होतो. आर्यर्वेदामध्ये ही वनस्पती एक औषध म्हणूनच वापरतात.

छातीत जळजळ होत असेल तर उत्तम उपचार

पचनशक्तीची समस्या असेल तर तुम्हाला छातीत जळजळण्याचा त्रास होतो. तुम्हाला छातीत जळजळण्याचा नेहमी त्रास होत असेल तर जेवणापूर्वी तुम्ही कोरपडीचा रस घ्या. त्यामुळे काही वेळातच छातीत जळजळण्याचा त्रास कमी होईल.

मधुमेह असणाऱ्यांसाठी कोरपड फायदेशी

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी कोरपड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी रोज दोन चमचे कोरपडीचा रस पिऊन घ्या. त्यामुळे तुम्हीला असणारा त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहू शकते. त्यासाठी कोरपडीचा रस साध्या पाण्याबरोबर घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या घरी कोरपड लावलेली असेल तर कायमस्वरुपी त्याचा वापर करु शकता.

शरीरातील विषारी घटक बाहेर

कोरफड ही इतकी फायदेशीर असते की, तुमच्या शरीरातील विषारी घटक ती बाहेर काढण्याचे काम करत असते. वाढलेले वजन जर तुम्हाला कमी करायचे असेल तर दररोज एक चमचा आवळ्याचा रस आणि दोन चमचे कोरफडीचा रस कोमट पाण्यातून घ्या त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.

यकृतासाठी फायदेशीर

कोरफड हे लिव्हरसाठीही चांगले काम करते. कोरपडीचे तुम्ही जर दररोज सेवन करत असाल तर तुमचे लिव्हर निरोगी राहते. कोरपडीच्या रसामुळे पोट साफ होते व कोरपडीमुळे होणारा बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.

संबंधित बातम्या

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता

हाडांमध्ये दुखणे Blood cancer तर नाही? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको…

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!