AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता

सिगारेट आणि दारूचे व्यसन करणाऱ्या प्रत्येकालाच यापासून धोका आहे. शरीरावर याचा कोणाताही सकारात्मक प्रभाव पडू शकत नाही. त्यापेक्षा जास्त महिलांना ही व्यसनं अधिक घातक ठरू शकतात. कारण पुरुष आणि महिलांची शारिरीक रचनाच सर्वार्थाने वेगळी आहे.

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 10:43 PM
Share

मुंबईः सिगारेट आणि दारू ही पुरुषांपेक्षा महिलांना जास्त घातक असते. सिगारेट आणि दारुच्या व्यसनामुळे महिलांना गर्भशयाचा कॅन्सर (Cervical cancer) होण्याची शक्यता असते. सिगरेट (Cigarettes) आणि दारूच्या (Alcohol) सेवनामुळे महिलांना कॅन्सरचा धोका हा असतोच पण तो शरीरातील रोगप्रतिकार शक्तीही मारुन टाकतो. त्यामुळे ही व्यसनं शरीरालाच कमजोर करुन टाकतात. त्यामुळे काही काळानंतर कमजोर झालेली रोगप्रतिकारक शक्ती शरीराविरुद्ध काम करू लागते. सिगरेट आणि दारुचे व्यसन प्रचंड असेल तर महिलांच्या शरीरातंर्गत होणारे रोग वाढणारे असतात आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.

सिगारेट आणि दारूचे व्यसन करणाऱ्या प्रत्येकालाच यापासून धोका आहे. शरीरावर याचा कोणाताही सकारात्मक प्रभाव पडू शकत नाही. त्यापेक्षा जास्त महिलांना ही व्यसनं अधिक घातक ठरू शकतात. कारण पुरुष आणि महिलांची शारिरीक रचनाच सर्वार्थाने वेगळी आहे.

जर महिलावर्ग खूप मोठ्या प्रमाणात सिगारेट, दारू किंवा ड्रग्स घेत असतील त्या नक्कीच त्याची शिकार होतात. त्यामुळे त्यांनी या व्यसनामुळे होणारे पुरुषांपेक्षा लवकर होतात. याबाबत वैद्यकशास्त्रात अनेकदा याबाबत धोका असल्याचे सांगितले आहे.

स्तनाचा कर्करोग

सततच्या दारु सेवनामुळे महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. दारू आणि सिगारेटचा व्यसन केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम स्त्रियाच्या शरीरावर होतात. स्तनाचा कर्करोग झाला तर भावनात्मकदृष्ट्याही महिलांना मोठा त्रास संभवतो. महिलाना स्तनाच्या कर्करोगाचा किंवा इतर रोगांचे निदान झाले की, त्या भावनात्मकदृष्ट्या कोलमडून पडतात. तर काही महिला ते दुःख विसरण्यासाठी सिगारेट आणि दारूला जवळ करतात, त्याचा विपरित परिणाम शरीरावर होतो आणि तो दोन प्रकारचा असतो. त्यामुळे महिलांना आणखी त्रास होतो.

गर्भाशयाचा कर्करोग

महिलांना व्यसनाचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो त्यांच्या गर्भाशयाला. प्रमाणापेक्षा जास्त सिगरेट आणि दारु पिणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना गर्भशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. ही व्यसनं त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी करतात. आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की, शरीराला झालेले रोग लवकर बरे होत नाहीत, आणि त्याचा शेवट अशा महाभयानक रोगामध्ये होतो.

चक्कर येणे

चक्कर येणे ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या जवळ जाणारा त्रास आहे. चक्कर येण्याची समस्या आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांना त्रास होतो. त्यामुळे दारू आणि सिगरेटचे अतिव्यसन केले चक्कर येणे यासारख्या रोगाला महिला बळी पडतात.

ह्रदयविकार आणि पक्षाघात

ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांवर्गात कमी आहे. मात्र त्यांना ह्रदयविकाराचा झटका आलाच तर त्यातून त्या बऱ्या होण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे महिलांना जर ह्रदयविकाराचा झटका आला तर त्यांचा मृत्यू होण्याचीच जास्त शक्यता असते. पक्षाघाता त्रास हा पुरुषांना जास्त असतो, तर महिलांच्या हॉर्मोनल सिस्टममुळे त्यांना पक्षाघात होण्याचे प्रमाण कमी असते, मात्र महिला जर दारु आणि सिगरेटचे जास्त व्यसन करत असतील तर हॉर्मोनल सिस्टमची ताकद कमी करते. त्यामुळे महिलांना सिगरेट आणि दारुमुळे ह्रदयविकार आणि पक्षाघाताची शक्यता जास्त असते.

संबंधित बातम्या

हाडांमध्ये दुखणे Blood cancer तर नाही? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको…

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!

भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या कारणांकडे करू नका दुर्लक्ष!

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.