डोकेदुखीपासून ते डिहायड्रेशनपर्यंत, सर्वांवर रामबाण इलाज, कोरफडीचे सरबत नक्की ट्राय करा, रिझल्ट 100 टक्के

| Updated on: Oct 28, 2021 | 9:16 AM

तुम्ही दररोज कोरफडीचे सरबत पिऊ शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया तुम्ही हे सरबत तुम्ही कसे बनवू शकता आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.

डोकेदुखीपासून ते डिहायड्रेशनपर्यंत, सर्वांवर रामबाण इलाज, कोरफडीचे सरबत नक्की ट्राय करा, रिझल्ट 100 टक्के
aloe vera
Follow us on

मुंबई : निसर्गात बहूमुल्य अशा वनस्पती आहेत. यामधील कोरफड तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि पोषक तत्व असतात या सर्वाचा आपल्या अरोग्याला खूप फायदेशीर असतो. कोरफड सरबत प्यायल्याने अपचन, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपचार करता येतात.

जर तुम्हाला कोरफडीचे सरबत आवडत नसेल तर तुम्ही कोरफडीचे वेगळ्या प्रकाराचे सरबत तयार करू शकता. ह्या सरबत तुम्ही रोज सेवन करू शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया तुम्ही हे सरबत तुम्ही कसे बनवू शकता आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.

कोरफडीचे सरबत बनवण्याची कृती

कोरफडीचे पान – १
लिंबाचा रस – २ चमचे
किसलेला गूळ – १ चमचा
चवीनुसार मध
थंड पाणी – ३/४ ग्लास
जिरे – १/२ टीस्पून
लाल मिरची – १/२
काळे मीठ चवीनुसार
चाट मसाला – १/२ टीस्पून

कृती

कोरफडीचे पान घ्या आणि त्याचे जेल चमच्याने काढा. एका भांड्यात ठेवा. आता मिक्सर ग्राइंडर घ्या. त्यात लिंबाचा रस, कोरफडीचे जेल आणि मध टाका. हे मिश्रणातील योग्य प्रकारे मिक्स करुन घ्या. मिश्रणात गूळ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. आता या मिश्रणात थंड पाणी घालून बारीक करा. कढईत लाल मिरची आणि जिरे परतून घ्या. यानंतर जिरे आणि मिरची बारीक करून बाजूला ठेवा. एक ग्लास घ्या आणि त्यात काळे मीठ, चाट मसाला आणि भाजलेले जिरे आणि तिखट घाला. आता यामध्ये कोरफडीचे जेल ग्लासमध्ये ओता आणि चांगले मिसळा. आपल्या पेयाचा आनंद घ्या.

कोरफडीचे आरोग्य फायदे

डोकेदुखीपासून ते डिहायड्रेशन, कोरडी त्वचा आणि पोटाच्या समस्या होऊ लागतात. मात्र, या समस्यांवर तुम्ही अनेक घरगुती उपायही करून पाहू शकता. यापैकी एक म्हणजे कोरफड. कोरफडीचे सरबत उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे. शरीराला आवश्यक हायड्रेशन देण्यापासून ते अनेक आजार बरे करण्यास मदत करते.

आजारांपासून मुक्ती मिळण्यासोबतच कोरफडीचे सरबत शरीराला थंडावाही देते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एलोवेरा सिरपचे सेवन केले तर तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

कोरफड सिरप शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील प्रभावी आहे. शरीरात अनेक विषारी पदार्थ असतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरीर आणि त्वचा निरोगी राहते.

 

इतर बातम्या :

Paneer Barfi Recipe : घरचे-घरी तयार करा खास पनीर बर्फी, जाणून घ्या रेसिपी! 

Immunity Booster Sweet: दिवाळीत तुम्हीही फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी मिठाई खा, जाणून घ्या याबद्दल अधिक! 

Skin Care Tips : मुलायम त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती कॉफी स्क्रब फायदेशीर!