Skin Care Tips : मुलायम त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती कॉफी स्क्रब फायदेशीर! 

जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या त्वचेवर घाण आणि धूळ जमा होऊ लागते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. तुमच्या त्वचेतून धूळ, घाण आणि जास्तीचे तेल काढून टाकण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्क्रब करणे हा आहे.

Skin Care Tips : मुलायम त्वचा मिळवण्यासाठी 'हे' घरगुती कॉफी स्क्रब फायदेशीर! 
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 3:46 PM

मुंबई : जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या त्वचेवर घाण आणि धूळ जमा होऊ लागते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. तुमच्या त्वचेतून धूळ, घाण आणि जास्तीचे तेल काढून टाकण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्क्रब करणे हा आहे. आपल्यापैकी बरेच जण CTM किंवा क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करतात. मात्र, त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी स्किन स्क्रबिंगची खूप महत्वाची आहे.

निरोगी त्वचेसाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील सर्व मृत त्वचेच्या पेशी काढून टाकायच्या असतील तर तुम्ही स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. बाजारात अनेक प्रकारचे बॉडी आणि फेस स्क्रब उपलब्ध आहेत. पण घरी बनवलेले कॉफी स्क्रब अधिक फायदेशीर आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ते तुमच्या त्वचेसाठीही चांगले आहे.

होममेड कॉफी स्क्रब

यासाठी तुम्हाला 2 टेबलस्पून कॉफी, 1 टेबलस्पून खोबरेल तेल आणि 1 टेबलस्पून साखर लागेल. एका भांड्यात सर्व साहित्य चांगले मिसळा. जर तुम्हाला ते तुमच्या संपूर्ण शरीरावर लावायचे असेल तर अधिक मिसळा. तुमचा कॉफी स्क्रब तयार आहे. तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर हलक्या हाताने मसाज करा आणि काही वेळ ठेवा आणि धुवा.

कॉफीचे फायदे

कॉफी पेशींच्या वाढीस मदत करते. हे कोलेजनचे उत्पादन वाढविण्यात मदत करते आणि तुमची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनवते. कॉफी त्वचेतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी बनते. स्क्रबच्या स्वरूपात कॉफी त्वचेतील सर्व मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. असे म्हटले जाते की कॉफी स्क्रब वापरल्याने सेल्युलाईट कमी होण्यास मदत होते. ते तुमची त्वचा घट्ट करते. कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे तुमच्या त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात.

नारळ तेलाचे फायदे

एक्सफोलिएशनसोबतच तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझेशनही आवश्यक आहे. अशावेळी खोबरेल तेल तुम्हाला मदत करते. निरोगी चरबीने समृद्ध, खोबरेल तेल तुमची त्वचा मऊ करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे त्वचेच्या समस्या दूर ठेवतात. नारळ तेल देखील कोलेजन उत्पादन सुधारण्यास मदत करते.

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल वापरल्याने तुमची त्वचा मॉइश्चरायझिंग होण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. खोबरेल तेल त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. हे तुमचे छिद्र देखील स्वच्छ करते. यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसत नाही.

साखरेचे फायदे

साखर तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यात मदत करते. हे मृत त्वचेच्या पेशी स्वच्छ करते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते. साखरेचा स्क्रब त्वचेतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This homemade coffee scrub is beneficial for soft skin)

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.