अॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर… अन्न पॅक करण्यासाठी कोणते योग्य? जाणून घ्या
लोकं अनेकदा अन्न पॅक करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल आणि बटर पेपर वापरतात. दोघांचेही स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. पण दोघांपैकी कोणते योग्य आहे ते जाणून घ्या.

आपल्यापैकी अनेकजण लांबच्या प्रवासात अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर वापरतात. अशातच आपण मुलांना किंवा ऑफिसमध्ये डब्ब्यामध्ये चपाती, पराठे देताना अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतो. असे केल्याने चपाती व पराठे गरम राहतात. यासोबतच एखादा पदार्थ बेक करताना बटर पेपर वापरतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की यापैकी कोणता पर्याय तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे?
कारण आजकाल प्रत्येक लोकं आरोग्य आणि अन्न सुरक्षेबाबत पूर्वीपेक्षा जास्त सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत दररोज वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम फॉइल व बटर पेपर यांचा अन्न पदार्थ पॅकिंग केल्यानंतर त्यातुन अन्नाचे सेवन करणे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. चला तर मग जाणून घेऊयात अॅल्युमिनियम फॉइल आणि बटर पेपर यापैकी कोणता पर्याय अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.
अॅल्युमिनियम फॉइलचे फायदे आणि तोटे
अॅल्युमिनियम फॉइलचे फायदे:
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न बराच वेळ गरम राहते. तसेच त्यात पॅक केलेले अन्न लवकर खराब होत नाही. कारण अॅल्युमिनियम फॉइल उच्च तापमान सहन करू शकते, म्हणून आपण अनेकदा पाहतो की बेकिंग आणि ग्रिलिंगमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो.
अॅल्युमिनियम फॉइलचे तोटे:
खूप गरम अन्न किंवा आम्लयुक्त अन्न (जसे की टोमॅटो, लिंबू, चिंच इ.) त्यात पॅक केल्याने अॅल्युमिनियमचे कण अन्नात मिसळू शकतात. संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, शरीरात जास्त अॅल्युमिनियममुळे न्यूरोलॉजिकल विकार (जसे की अल्झायमर) आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मायक्रोवेव्हमध्ये अॅल्युमिनियम फॉइल वापरणे धोकादायक ठरू शकते कारण त्यामुळे ठिणग्या निर्माण होऊ शकतात.
बटर पेपर किती सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे?
बटर पेपरचे फायदे :
बटर पेपर पूर्णपणे नॉन-स्टिक नसते, त्यामुळे अन्न त्यावर चिकटत नाही. त्यामुळे तेल आणि ओलावा शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे अन्न ताजे राहते. तसेच, बेकिंग आणि फूड रॅपिंगसाठी हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. हे रसायनमुक्त आहे आणि अन्नात कोणतेही हानिकारक कण सोडत नाही.
बटर पेपरचे तोटे:
बटर पेपर अॅल्युमिनियम फॉइल इतके चांगले इन्सुलेशन देत नाही, त्यामुळे अन्न जास्त काळ गरम राहत नाही. तसेच ते खूप जास्त तापमान देखील सहन करू शकत नाही, विशेषतः जर ते वॅक्स-कोटेड असेल तर.
कोणता पर्याय चांगला आहे?
जर तुम्हाला जास्त काळ अन्न गरम ठेवायचे असेल तर अॅल्युमिनियम फॉइल हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु आम्लयुक्त आणि खूप गरम पदार्थांसोबत ते वापरणे टाळा. त्याच वेळी जर तुम्हाला अधिक निरोगी आणि सुरक्षित पर्याय हवा असेल, तर बटर पेपर अधिक चांगला असेल, विशेषतः बेकिंग आणि फूड रॅपिंगसाठी. बटर पेपर हा रोजच्या जेवणासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे, तर अॅल्युमिनियम फॉइल मर्यादित प्रमाणात वापरावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
