वजन कमी करण्यासाठी तुम्हीही फॉलो करताय का ‘लो कार्ब’ आहार; मग आधी हे जाणून घ्या…

Low carb diet : चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे अनेक आजार किंवा आरोग्याच्या समस्या सुरू होतात. यासाठी अनेक लोक, लो कार्ब आहाराला प्राधान्य देतात. परंतु, लो कार्ब खाल्याने, काही नुकसान होऊ शकते. जाणून घ्या, लो कार्ब म्हणजे काय आणि त्यासंबंधी काही गोष्टींची काळजी न घेतल्यास शरीराला काय नुकसान होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही फॉलो करताय का ‘लो कार्ब’ आहार; मग आधी हे जाणून घ्या...
Weight LossImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 9:58 PM

अयोग्य जीवनशैलीमुळे वजन वाढणे, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब (High blood pressure) यांसारखे अनेक आजार किंवा आरोग्याच्या समस्या लोकांना सहज आपल्या कवेत घेत आहेत. वजन वाढणे हे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. वजन कमी करण्यासाठी डाएट फोकस आणि व्यायामाची दिनचर्या (Exercise routine) पहिल्यापासून पाळली जात होती, पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता लोकांनी अशा अनेक युक्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे, ज्यांच्यामुळे असे मानले जाते की, ते कमी वेळेत वजन कमी करू शकतात. यापैकी एक म्हणजे कमी कार्ब आहाराचा दिनक्रम (Low carb diet plan) परंतु, लो कार्ब खाल्याने, काही नुकसान होऊ शकते. जाणून घ्या, लो कार्ब म्हणजे काय आणि त्यासंबंधी काही गोष्टींची काळजी न घेतल्यास शरीराला काय नुकसान होऊ शकते.

कमी कार्ब आहार म्हणजे काय ?

या कमी-कार्बोहायड्रेट आहारात, दररोज 20 ते 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाण्याची शिफारस केली जाते. कार्बोहायड्रेट्सचे हे प्रमाण 80 ते 240 कॅलरीज प्रदान करते. बहुतेक प्रकरणांमध्ये, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते लो कार्ब आहार घेतात. जरी या आहाराची लोकप्रियता वाढत आहे, परंतु यामुळे नुकसान देखील होते.

यामुळे शरीराचे नुकसान होते

चक्कर येणे : जे लोक कमी कार्ब आहाराचे पालन करतात त्यांच्यापैकी बहुतेकांना चक्कर येण्यासारख्या समस्या सुरू होतात. तज्ज्ञांच्या मते, अन्नाच्या कमतरतेमुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते. अशा स्थितीत अशक्तपणा येतो आणि चक्कर येणे सुरू होते. तज्ञ देखील कमी कार्ब आहाराचे पालन करण्याचे सांगतात, परंतु त्यात महत्वाच्या पोषक तत्वांची कमतरता पडू देऊ नका.

हे सुद्धा वाचा

हृदयाच्या समस्या : संशोधनात असे समोर आले आहे की, जर कमी कार्बोहायड्रेट आहाराची दिनचर्या दीर्घकाळ पाळली गेली तर त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, या चुकीमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. अशावेळी हृदयविकाराचा धोका वाढतो.

सक्रिय राहण्यात अडचण : ऍथलीट किंवा क्रीडा व्यक्ती सक्रिय राहण्यासाठी चांगले कार्ब आहार घेतात. शरीरासाठी कार्बोहायड्रेट किती महत्त्वाचे आहेत हे यावरून तुम्हाला समजते. कमी कार्बोहायड्रेट आहार आपल्या शारीरिक हालचालींमध्ये अडथळा आणू शकतो. (Are you also following a low carb diet to lose weight, know its disadvantages)

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.