केळीच्या साली फेकून देताय? असं करु नका, सालीपासून बनवा चविष्ट चटणी

लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना केळी खायला प्रचंड आवडतात. डॉक्टर देखील केळी खाण्यचा सल्ला देत असातात. पण फक्त केळी नाही तर, केळीची साल देखील उपयुक्त आहे. सालीपासून तुम्ही चविष्ट चटणी करु शकता...

केळीच्या साली फेकून देताय? असं करु नका, सालीपासून बनवा चविष्ट चटणी
| Updated on: Apr 12, 2026 | 3:08 PM

बाजार केळी सहज मिळतात. म्हणून केळी प्रत्येक घरात सहज मिळतात. आपण सहसा पिकलेली केळी विकत घेतो. त्यांचा उपयोग ग्रीन राईस किंवा इतर कोणते पदार्थ तयार करण्यासाठी होतो. अनेक पदार्थांसाठी देखील केळीचा वापर केला जातो. केळीचा वापर झाल्यानंतर आपण साल फेकून देतो. पण साल देखील उपयुक्त आहे. सालीपासून तुम्ही चविष्ट चटणी करु शकता. जर जाणून घ्या केळीच्या सालीपासून कशी तयार केली जाते चटणी…

बऱ्याच लोकांना हे माहित नसतं की, आपण कचरा समजून फेकून देत असलेल्या गोष्टींपासून इतका स्वादिष्ट पदार्थ बनवू शकतो. भात, चपाती आणि डोसा यांसोबत खाता येणाऱ्या या स्वादिष्ट चटणीची रेसिपी जाणून घ्या. सर्वात आधी चटणी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागतात जाणून घ्या…

साहित्य: 2 धुतलेली आणि स्वच्छ केलेली हिरवी केळी, चिरलेला कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची, लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, मोहरीचे तेल, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस…

फळाच्या सालीमध्ये कीटकनाशके असू शकतात, म्हणून ते मीठ आणि हळद घातलेल्या पाण्यात 15 मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. मग त्याचे लहान तुकडे करा. एका कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे शिजल्यावर त्यात चिरलेला कांदा, लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि भाजलेल्या मिरच्या घाला. हिरवा वास जाईपर्यंत परता.

नंतर त्यात कापलेली केळ्याची साल आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिसळा. मग कोथिंबीर घालून गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात घालून चांगले वाटून घ्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस आणि मोहरीच्या तेलाचा एक थेंब घालू शकता.

फळांच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, फळांच्या सालीमध्ये असलेले ट्रिप्टोफॅन निद्रानाशावर उपाय म्हणून आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी खूप चांगले आहे. त्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ल्युटीनही भरपूर प्रमाणात असते.

Follow Us