AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips | उन्हाळ्यात अशाप्रकारे कोरफड आणि भाताचे पाणी वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा, जाणून घ्या फायदे!

घरगुती उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेला लवकर इजा करत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या त्वचेसाठी कोरफड आणि भाताचे पाणी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) असते. कोरफड आणि भाताच्या पाण्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात कोरफड आणि भाताच्या पाण्याचे फायदे.

Skin Care Tips | उन्हाळ्यात अशाप्रकारे कोरफड आणि भाताचे पाणी वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा, जाणून घ्या फायदे!
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 12:32 PM
Share

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची काळजी (Care) घेण्यासाठी आपण महागडी उत्पादने वापरतो. कारण या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, कितीही महागडी उत्पादने वापरली तरीही त्वचेच्या समस्या काही कमी होत नाहीत. यासाठी त्वचेच्या सर्व समस्या या हंगामामध्ये दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies) अत्यंत फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेला लवकर इजा करत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या त्वचेसाठी कोरफड आणि भाताचे पाणी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) असते. कोरफड आणि भाताच्या पाण्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात कोरफड आणि भाताच्या पाण्याचे फायदे.

कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते

भाताचे पाणी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. ते अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. याशिवाय भाताच्या पाण्याचा वापर सनबर्नवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्या आणि त्यात एक चमचा कोरफडीचे जेल टाका, नीट मिक्स केल्यानंतर काही वेळ राहू द्या, चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते धुण्यास विसरू नका. असे केल्याने चेहऱ्यावरील घाण चेहऱ्याच्या आत जाणार नाही. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी राहू द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

कोरफड आणि भाताच्या पाण्यामुळे त्वचेवरील टॅन दूर होतो

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेवर येणारा घाम यामुळे चिडचिडेपणासोबतच खाज येऊ शकते. अशा परिस्थितीत त्वचेला आराम देण्यासाठी तांदळाचे पाणी आणि कोरफडीचे जेल फायदेशीर ठरते. यासाठी भाताचे ताजे पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कोरफड जेल मिक्स करा. ही पेस्ट आता आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील टॅन जाण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?