चेहरा चमकदार बनवायचाय? मग दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट अन्…
घरच्या घरी तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवायची असेल तर दही वापरणे हा उत्तम उपाय आहे. दह्यामध्ये त्वचेला पोषक गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.
Yogurt Face Mask : चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेकदा बाजारातून महागडे स्किन केअर प्रॉडक्ट विकत घेतो. पण त्यामध्ये आपले पैसेही जातात. त्याचा पाहिजे तसा फायदाही आपल्याला होत नाही. नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांचा अवलंब केला जातो. पण अनेक वेळा ते आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला घरच्या घरी तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवायची असेल तर दही वापरणे हा उत्तम उपाय आहे. दह्यामध्ये त्वचेला पोषक गुणधर्म असतात जे त्वचेला फक्त हायड्रेट करत नाही, तर तिची चमक देखील वाढवतात.
दही आणि हळदीचा फेसपॅक
हळदीमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आहे. दह्यात हळद मिसळून चेहऱ्याची मालिश केल्याने याचे अनेक फायदे मिळतात. यामुळे त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. हा पॅक बनवण्याची आणि वापरण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे.
फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- दोन चमचे दही
- अर्धा टी स्पून हळद पावडर
फेसपॅक लावण्याची पद्धत
- दोन चमचे दह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून हे व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्या.
- त्यानंतर ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा.
- दोन मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
- यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेवर चमक येते. दही त्वचेचे पोषण करते आणि हळद डाग मिटवते.
- काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात बदल जाणवायला लागेल.
दही आणि मध : दह्यामध्ये मध मिसळून लावल्याने त्वचेला आर्द्रता मिळते आणि निस्तेज त्वचेला संजीवनी मिळते.
दही आणि बेसन : बेसन आणि दह्याची पेस्ट त्वचेला एक्सपोलीएट करते आणि मृत त्वचा काढून टाकते.
काळजी घ्या
फेसपॅक बनवताना दही ताजे असल्याची खात्री करून घ्या. या फेसपॅकमुळे त्वचेवर जळजळ झाल्यास लगेच पाण्याने धुवून घ्या. फेसपॅक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट अवश्य करा.