AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासोबतच त्वचाही राहील निरोगी, फक्त कराल एकच काम… 

लिंबाचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. विशेषतः लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था तर निरोगी राहतेच पण त्याचबरोबर शरीराला इतर अनेक प्रकारे फायदा होतो.

वजन कमी करण्यासोबतच त्वचाही राहील निरोगी, फक्त कराल एकच काम... 
| Edited By: | Updated on: Nov 17, 2024 | 4:21 PM
Share

लिंबू हे फक्त एक आंबट फळ नसून ते पोषक तत्वांचा खजिना असलेले पॉवर हाऊस आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट, फायबर, मिनरल्स सारख्या पोशक तत्वांनी समृद्ध आहे. लिंबू तुमच्या शरीराला आतून पोषण देते.

लिंबूचे रोज सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विशेषतः दररोज लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त आहे. जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. याशिवाय लिंबू पाणी त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करते. लिंबू पाणी दररोज पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

त्वचा निरोगी ठेवते : लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे त्वचेला निरोगी ठेवतात, कारण व्हिटॅमिन सी कॉलेजन तयार करण्यास मदत करते. जे त्वचा घट्ट आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

वजन कमी करण्यास मदत करते : लिंबू पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. त्याच्या सेवनाने चयापचय गतिमान होते. भूक नियंत्रित ठेवण्यास आणि दिवसभर ताजेपणा राखण्यास मदत होते. त्यामुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते.

मूडफ्रेश होतो : लिंबू पाणी प्यायल्याने मूड फ्रेश होतो. हे मानसिक थकवा कमी करण्यासाठी आणि तुम्हाला ताजेतवाने वाटण्यास उपयुक्त आहे. याचे दररोज सेवन केल्याने माणसाला ताजतवाने वाटते.

हायड्रेट ठेवते : लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. हे शरीराला हायड्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा आणि शारीरिक कार्यासाठी आवश्यक आर्द्रता राखते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते : लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. याच्या रोजच्या सेवनाने हंगामी आजारांचा धोका कमी होतो.

पचनसंस्था सुधारते : लिंबू पाणी पोटाची जळजळ कमी करण्यास मदत करते आणि पचन प्रक्रिया सुधारते. हे शरीरात हायड्रेशन राखते जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्टता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.

शरीर डिटॉक्स करते : लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ करण्यासाठी हे उपयुक्त आहे. सकाळी लिंबू पाणी प्यायला नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स होते.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा