Curry Leaves Benefits : केस गळती कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा हेअर मास्क अशा प्रकारे तयार करा, वाचा!

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळणे कमी करण्यासाठी आपण घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. यासाठी आपण कढीपत्ता देखील वापरू शकता.

Curry Leaves Benefits : केस गळती कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा हेअर मास्क अशा प्रकारे तयार करा, वाचा!
कढीपत्त्याची पाने
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 10:08 AM

मुंबई : केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळणे कमी करण्यासाठी आपण घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. यासाठी आपण कढीपत्ता देखील वापरू शकता. कढीपत्त्यामुळे केस गळणे कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता बहुतेक लोकांच्या घरात आढळतो. कढीपत्त्यामध्ये केसांसाठी फायदेशीर असे गुणधर्म आहेत. कढीपत्त्यामध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटीनिक अॅसिड भरपूर असते. (Curry Leaves hair mask is beneficial to prevent hair loss)

कढीपत्ता, आवळा आणि मेथी – आपण केस गळती थांबवण्यासाठी कढीपत्ता वापरू शकता. कढीपत्ता, आवळा आणि मेथीचा खास हेअर पॅक घरी तयार करू शकतो. यासाठी आपल्याला 10-15 कढीपत्त्याची पाने, मेथी पावडर आणि आवळा पूड दोन चमचे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून आपल्या केसांना लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर ठेवा आणि कोमट पाण्याने केस धुवा. या हेअर पॅकमुळे आपली केस गळती कमी होण्यास मदत होते.

कढीपत्ता आणि नारळ तेल – नारळ तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण केसांचे टॉनिक बनवण्यासाठी कढीपत्त्यासह नारळ तेल मिक्स करू शकता. यासाठी तुम्ही नारळाचे तेल घ्या आणि त्यात कढीपत्ता घाला. आता हे मिश्रण गरम करा. मिश्रण थंड होऊ द्या आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा. या मिश्रणाने आपल्या टाळूची संपूर्ण मालिश करा. हे आपल्या केसांवर मुळापासून टोकापर्यंत लावा. काही तास असेच ठेवा. त्यानंतर केस धुवा. आपण हे मिश्रण तयार करुन ठेवू शकतो. यामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

कढीपत्याचे फायदे – कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे आणि पांढरे केस ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल तर आपण कढीपत्त्याचा वापर केसांसाठी केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Curry Leaves hair mask is beneficial to prevent hair loss)

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.