AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक त्वचेला लावा; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

चमकदार आणि मुलायम त्वचा कोणाला नको असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.

मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक त्वचेला लावा; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई : चमकदार आणि मुलायम त्वचा कोणाला नको असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, अनेक उत्पादने वापरून सुध्दा म्हणावी तशी त्वचा सुंदर होत नाही. जर आपल्याला सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे असेल तर आपण काही घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. (Multani soil, honey and lemon face pack beneficial)

मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुलतानी माती एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा आणि मध एक चमचा मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकतो.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते. लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते. लिंबूमध्ये ब्लीचिंगचे गुणधर्म आहेत. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. लिंबू तेलकट त्वचेसाठी चांगले आहे. हे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. लिंबू हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते.

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल, तर आपण मध वापरू शकता. मध आपली त्वचा हायड्रेट करण्यासाठी, तसेच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. कोरड्या त्वचेवर मध लावून आपण तिला मॉइश्चराइझ करू शकता. मध एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा परत आणण्याचे काम करते. दररोज मध लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी दिसते. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, जे आपल्या जखमा बऱ्या करण्यास मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Multani soil, honey and lemon face pack beneficial)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.