AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात मिळणाऱ्या उटण्याचा कंटाळा आलाय? , घरच्या घरी बनणारे 4 उटण्याचे प्रकार नक्की ट्राय करा

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

बाजारात मिळणाऱ्या उटण्याचा कंटाळा आलाय? , घरच्या घरी  बनणारे 4 उटण्याचे प्रकार नक्की ट्राय करा
utne
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 02, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई : दिवाळी म्हणजे रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ. याव्यतिरिक्त दिवाळीसाठी उटणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे.  पूर्वीच्या काळी लोक घरीच उटणे तयार करायचे. पण हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

​हळद- तिळाचे उटणे

मिक्सरच्या भाड्यांमध्ये वरील सर्व सामग्री एकत्र घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करा. उटणे तयार झाल्यानंतर चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर अंग स्वच्छ धुऊन घ्या. या उटण्याच्या वापरामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार होण्यास मदत मिळते.

हळद, तिळाचे तेल आणि चंदन

वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर, दोन ते तीन चमचे तिळाचे तेल घ्या आणि बारीक पेस्ट तयार करा. यानंतर त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. तयार आहे तुमचे घरगुती उटणे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळद, चंदन आणि तिळाच्या तेलाला भरपूर महत्त्व आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वी चंदनाचा उपयोग केला जात असे. चंदनामधील गुणर्धमामुळे तत्वचेला थंडावा मिळतो.

हळद, चंदन, तांदळाचे पीठ, बेसन, गुलाब पाणी

अर्धा मोठा चमचा तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी, चंदन पावडर आणि तिळाच्या तेलाचे एक ते दोन थेंब मिक्स करा. सर्व सामग्री नीट एकजीव करा. चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर हे उटणे लावा आणि अभ्यंगस्नान करा. तुम्ही रक्तचंदनाचाही उपयोग करू शकता. यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत मिळते. हे उटणे एक उत्तम स्क्रबर म्हणून काम करेल.

हळद, चंदन, तांदळाचे पीठ, गुलाब पाणी व दुधाची मलई

दुधाच्या मलईमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. एका वाटीमध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी व दुधाची मलई देखील मिक्स करा. सर्व सामग्री नीट मिक्स करून उटणे तयार करा आणि संपूर्ण शरीरावर लावा. यातील नैसर्गिक सामग्रींमुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. याव्यतिरिक्त आपण मुलतानी माती, दही, मसूर डाळ, मध किंवा दुधापासून घरगुती उटणे तयार करता येईल.

ही काळजी घ्या :

काही लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना नैसर्गिक सामग्रींमुळेही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून नेहमी पॅच टेस्ट करून पाहावी. त्वचेसाठी नैसर्गिक किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या हाताच्या त्वचेवर पेस्ट किंवा लेप लावून पाहावा. त्वचेवर जळजळ किंवा खाज येणे, त्वचा लाल होणे यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास उपाय करणं टाळावं.

इतर बातम्या :

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Follow Us
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप.

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं.

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !.

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !