फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

स्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊयात भाजल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करु शकता.

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा
burn
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 9:35 AM

मुंबई : प्रत्येकाच्या घरात आता दिवाळीची गडबड सुरु असते.या गोंधळामध्ये घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊयात भाजल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करु शकता.

कोरफड –

भाजलेल्या ठिकाणी कोरफड लावल्यामुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही, त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.

मध –

सर्वांच्याच घरात उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे मध. मधेचा आयुर्वेदामध्ये विषेश महत्त्व प्रप्त आहे. खोकला असल्यास मधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात,.मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

सौम्य लव्हेंडर ऑइल –

वेदना कमी करण्यासाठी हेही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. सौम्य लव्हेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील ‘व्हिटॅमिन सी’ आणि लव्हेंडर ऑइलमधील ‘व्हिटॅमिन इ’ एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण जखमेवर दिवसभर लावून ठेवावे.

केळ्याची साल –

केळ हे फळ 12 महिने सर्वत्र उपलब्ध असते. केळ्याची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यास केळ्याची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

दही –

दही देखील आपल्याला सर्रस उपलब्ध होतो. प्रत्येक घरामध्ये हे असतेच भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल –

जर तुमच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल असल्यास भाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो. थोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

इतर बातम्या :

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Stale food Side Effects: जाणून घ्या शिळे अन्न खाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.