AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! चहा, नाश्ता एकत्र करताय? अनेक आजारांना निमंत्रण देताय

काळचा नाश्ता संपूर्ण दिवसातील महत्त्वाचं अन्न मानलं जातं. संपूर्ण रात्रीनंतरच्या उपवासा नंतर आपण हे पहिले अन्न ग्रहण करतो. म्हणूनच त्याला इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट असं म्हाणतात. पण या नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाताय यावर तुमचे संपूर्ण आरोग्य आवलंबून असते. बर्‍याच जणांना नाश्ता झाल्यानंतर ही चहा पितात. पण त्यांचा ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक सवय ठरू शकते.

सावधान! चहा, नाश्ता एकत्र करताय? अनेक आजारांना निमंत्रण देताय
chai
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 1:05 PM
Share

मुंबई : सकाळचा नाश्ता संपूर्ण दिवसातील महत्त्वाचं अन्न मानलं जातं. संपूर्ण रात्रीनंतरच्या उपवासा नंतर आपण हे पहिले अन्न ग्रहण करतो. म्हणूनच त्याला इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट असं म्हाणतात. पण या नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाताय यावर तुमचे संपूर्ण आरोग्य आवलंबून असते. सामान्यतः प्रत्येक घरात सकाळी गरम नाश्त्यामध्ये मसाला चाय प्यायला जातो. जवळपास सर्वच घरांमध्ये नाश्त्यासोबत चहा पिण्यास प्राधान्य दिले जाते. खरे तर आळस दूर करण्यासाठी सकाळी चहाचेही सेवन केले जाते. चाहासोबतच पोहे, उपमा, शिरा किंवा एखादे फळ हे पदार्थ दिले जातात. बर्‍याच जणांना नाश्ता झाल्यानंतर ही चहा पितात. पण त्यांचा ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक सवय ठरू शकते. न्याहारीसोबत चहाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

नाश्त्यानंतर चहा पिणे हानिकारक आहे का?

अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की चहासोबत नाश्ता करणे योग्य आहे का? तज्ज्ञांच्या मते, केवळ पोहेच नाही तर इतर अनेक प्रकारचे स्नॅक्स जे लोक चहासोबत खातात ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

आयुर्वेद काय सांगतं ?

अन्न शास्त्र आणि आयुर्वेदानुसार नाश्ता आणि चहा हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत जे कधीही एकत्र सेवन करू नयेत.अन्नामुळे एक प्रकारची शक्ती मिळते, अशा स्थितीत 2 विरुद्ध ऊर्जा असलेले अन्न एकत्र सेवन केल्यास शरीरातील कार्यप्रणाली नीट काम करू शकत नाहीत, ज्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. अशी महिती आयुर्वेदात दिली आहे.

तज्ज्ञ काय सांगतात ?

तज्ज्ञांच्या मते, चहा आणि नाश्ता एकत्र केल्यामुळे अन्नाच्या मिश्रणामुळे शरीरात विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. हे आपल्या पचनसंस्थेवर आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की उलट्या, मायग्रेन आणि अपचन सारख्या समस्या अनेकदा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होतात, यामुळे अॅसिडिटीची समस्या देखील होऊ शकते.यामुळे त्वचेचे संक्रमण होऊ शकते. नाश्ता केल्यानंतर काही वेळाने तुम्ही चहाचे सेवन करू शकता, यामुळे आरोग्याचे फार नुकसान होत नाही. शक्यतो रिकाम्या पोटी चहा कधीच पिऊ नये.

इतर बातम्या :

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.