AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : गुलाब पाकळ्यांचा आणि दूधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!

सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण होममेड फेसपॅक देखील वापरू शकता. कारण दरवेळी साैदर्य उत्पादने वापरून आपण त्वचा सुंदर करू शकत नाहीत.

Skin Care : गुलाब पाकळ्यांचा आणि दूधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 29, 2021 | 8:29 AM
Share

मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण होममेड फेसपॅक देखील वापरू शकता. कारण दरवेळी साैदर्य उत्पादने वापरून आपण त्वचा सुंदर करू शकत नाहीत. विशेष म्हणजे केमिकलयुक्त साैदर्य उत्पादने काही वेळ त्वचा चांगली करतात. मात्र, त्यानंतर त्वचा खराब होण्यास सुरूवात होते. यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय केले पाहिजे. सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक सांगणार आहोत.(Face pack of rose petals and milk is beneficial for the skin)

ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला दोन गुलाब फुलांच्या पाकळ्या आणि दूध लागणार आहे. सर्वात अगोदर गुलाब पाकळ्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये तीन चमचे दूध मिक्स करा. ही पेस्ट आपल्या सर्व चेहऱ्याला व्यवस्थित लावा आणि साधारण वीस मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा खास फेसपॅक आपण दररोज देखील लावू शकतो. यामुळे आपल्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. लिंबू आणि कलिंगडचा फेसपॅक करण्यासाठी लिंबाचा रस आणि कलिंगड मिक्स करून घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of rose petals and milk is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली