Hair Tips : पांढऱ्या केसांवर पेरूच्या पानांचा वापर करा, काळे आणि चमकदार केस मिळवा…

| Updated on: Apr 03, 2022 | 12:14 PM

पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. केस आणि त्वचेसाठी हे फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या केसांसाठी पेरूची पाने वापरू शकता.

Hair Tips : पांढऱ्या केसांवर पेरूच्या पानांचा वापर करा,  काळे आणि चमकदार केस मिळवा...
केसांसाठी पेरूची पाने वापरा
Follow us on

मुंबई : आपले केस (Hair) दाट, मुलायम, काळे लांब असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण काही वेळा केस ड्राय होणं, अवेळी केस पांढरे होणं, अश्या समस्या जाणवू लागतात. यासाठी काय करता येईल असा प्रश्न अनेकांना समोर असतो. त्यावर काही घरगुती उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास तुमचे केस काळे होतील. असाच एक उपाय आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस काळे तर होतीलच शिवाय त्यांना शाईनही येईल. केसांच्या वाढीसाठीही हा उपाय खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे. हा प्रभावी उपाय आहे पेरूच्या पानांचा (Guava Leaves)… पेरूची पाने केसांसाठी उत्तम आहेत. त्यामुळे तुमचे केस अधिक मऊ होतील. चला तर मग जाणून घेऊयात पेरूच्या पानांचा वापर कसा करायचा…

पेरूच्या पानांचे पाणी

पेरूच्या पानांचे पाणीही केसांसाठी उपयुक्त आहे. पेरूची काही पाने धुवून घ्या. आता त्यांना एक लिटर पाण्यात उकळवा. 15 ते 20 मिनिटे उकळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळून बाटलीत काढा. त्यानंतर केस शाम्पूने धुवा. सुकल्यानंतर स्प्रेच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. 10 मिनिटे मसाज करा. पुढील काही तास केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

पेरूच्या पानांचा हेअर पॅक

पेरूच्या पानांपासून हेअर पॅक बनवून तो वापरला तर केसांसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी 15 ते 20 पेरूची पाने धुवून वाळवा. मिक्सरमध्ये पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट भांड्यात काढा.यानंतर केसांच्या केसांना लावा.काहीवेळ डोक्याचा मसाज करा. आता हेअरबँडच्या मदतीने केस बांधा आणि 30-40 मिनिटे राहू द्या.ते सुकल्यावर साध्या पाण्याने धुवावे. शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा हेअर पॅक लावल्यास केसांसाठी हे फायदेशीर आहे.

पेरूच्या पानांचे तेल

पेरूच्या पानांचा तेलात वापर करणंही केसांसाठी फायदेशीर आहे. पेरूची पाने धुवून मिक्सरमध्ये त्याची जाडसर पेस्ट तयार करा.आता त्यात छोटा कांदा टाकून प्युरी बनवा. आता एका कपड्याच्या साहाय्याने रस काढून घ्या. आता कांद्याच्या रसात पेरूची पाने आणि खोबरेल तेलाची पेस्ट मिसळा. ते केसांना लावा आणि बोटांनी हलका मसाज करा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. केस आणि त्वचेसाठी हे फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या केसांसाठी पेरूची पाने वापरू शकता.

(टीप- हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या…)

संबंधित बातम्या

सावधान…! मधुमेहामुळे डोळ्यांचे होऊ शकतात गंभीर विकार या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन

Skin Care : एप्रिल महिन्याला सुरूवात…! आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!

Health Care : मधुमेहाची समस्या? या 5 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!