सावधान…! मधुमेहामुळे डोळ्यांचे होऊ शकतात गंभीर विकार या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन

आजच्या काळात मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धक्काधक्कीच्या काळात 100 पैकी 40 लोकांना मधुमेहाचा त्रास होतो आहे. मधुमेह होण्याचे महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल (Lifestyle) आणि अनहेल्दी खाणे.

सावधान...! मधुमेहामुळे डोळ्यांचे होऊ शकतात गंभीर विकार या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन
मधुमेह आणि मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे आजार जाणून घ्या. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:00 AM

मुंबई : आजच्या काळात मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धक्काधक्कीच्या काळात 100 पैकी 40 लोकांना मधुमेहाचा त्रास होतो आहे. मधुमेह होण्याचे महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल (Lifestyle) आणि अनहेल्दी खाणे. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो, त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त असते. माणसाच्या शरीरात जर साखरेचे प्रमाण वाढले तर आरोग्याच्या (Health) अनेक समस्या निर्माण होत असतात. विशेष म्हणजे मधुमेहाचा त्रास सुरू झाली की, डोळ्यांचे अनेक विकार सुरू होण्यास देखील सुरूवात होते. यासर्व संदर्भात सविस्तरपणे माहिती डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितली आहे. मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांची कशी काळजी घ्यावी याविषयी खास टिप्स डॉ. अनघा यांनी सांगितल्या आहेत.

अनहेल्दी लाईफस्टाईल कारणीभूत

धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपले आरोग्याकडे विशेष: आहाराकडे अजिबात लक्ष राहिलेले नाही, शिवाय ताण-तणाव अधिक प्रमाणात वाढला आहे. व्यायाम आणि शारीरिक हालचाली करण्यासाठी कोणाकडेही वेळ राहिलेला नाहीये. त्यामध्येही कोरोनाच्या काळात शारिरिक हालचाली अत्यंत कमी झाल्या आहेत. आता कोरोना जवळपास गेला आहे. मात्र, लोकांना आता घरामध्येच बसण्याची सवय झाली आहे. यामुळे डायबिटीज, उच्च रक्तदाब आणि वाढलेले वजन यामुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत.

मधुमेहाचा डोळ्यांवर होणार परिणाम

आपल्याकडे लोकांना मधुमेह म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि चेक करणे इतकेच माहिती आहे. पण असे अजिबात नसून आपल्याला मधुमेहामध्ये डोळ्यांचे देखील अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मधुमेहामुळे डोळ्यांच्या रक्त वाहिन्या ह्या विक होण्यास सुरूवात होते. मधुमेहामध्ये डोळ्यांच्या पडद्यावर सूज देखील निर्माण होते. मधुमेहाची लागण झाल्यानंतर रूग्णाने दोन महिन्यातून किमान एक वेळातरी तज्ज्ञांकडून डोळ्यांचे चेकअप करून घ्यायला हवेच. मधुमेहाच्या रूग्णांनी ओसिटीस्कॅन करून घ्यायला हवे. यामुळे आपल्याला डोळ्यांच्यामध्ये नेमकी सूज किती आहे हे सर्व समजण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संंबधित बातम्या : 

Health care : हे डिटॉक्स ड्रिंक्स उष्णतेपासून नक्कीच दूर ठेवतील, कसे बनवायचे ते जाणून घ्या!

Banana benefits : त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर केळीचे सेवन, जाणून घ्या त्याचे फायदे! 

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.