AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana benefits : त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर केळीचे सेवन, जाणून घ्या त्याचे फायदे! 

केळीची (Banana) ओळख एक सुपरफूड म्हणून आहे. हे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. ते केवळ तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर ते आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. विशेष म्हणजे केळीचे दररोज सेवन केल्याने आरोग्याबरोबरच त्वचेच्या देखील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

Banana benefits : त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर केळीचे सेवन, जाणून घ्या त्याचे फायदे! 
त्वचेसाठी केळी अत्यंत फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 10:23 AM
Share

मुंबई : केळीची (Banana) ओळख एक सुपरफूड म्हणून आहे. हे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. ते केवळ तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर ते आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. विशेष म्हणजे केळीचे दररोज सेवन केल्याने आरोग्याबरोबरच त्वचेच्या देखील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. केळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यात अनेक प्रकारचे पोषक असतात. ते तुमची त्वचा (Skin) सुंदर बनवण्याचे काम करतात. केळी सहज बाजारामध्ये उपलब्ध होणारे फळ देखील आहे.

वाचा केळी खाण्याचे त्वचेला होणार फायदे…

  1. केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळते. त्वचा मऊ आणि निरोगी बनवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मॅंगनीज त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. कोलेजन हा प्रथिनांचा एक प्रकार आहे. त्यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आपण चेहऱ्यावर केळी आणि मध देखील लावू शकतो.
  2. केळ्यामध्ये पोटॅशियम असते. हे त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि रक्त दोन्हीचा प्रवाह राखण्यास मदत करते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. पोटॅशियम त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते. यामुळे केळीचा आहारात नक्कीच समावेश करावा.
  3. रोज केळी खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येईल. केळीमुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. केळी त्वचा बरे करण्याचे काम करते. दररोज केळी खाणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेच्या पेशी चांगल्या राहण्यास मदत होते. केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्वचेसाठी ते फायदेशीर मानले जाते.
  4. केळीमध्ये पोटॅशियम, लोह, मॅंगनीज आणि मॅग्नेशियमसारखे विविध घटक असतात. केळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे पोषक घटक त्वचेसाठी फायदेशीर असतात. ते त्वचा निरोगी बनवण्याचे काम करतात.
  5. सुंदर त्वचेसाठी केळीचा फेसपॅक घरच्या-घरी तयार करण्यासाठी आपण अर्धी केळी, दूध आणि मध घ्या. त्यानंतर तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करा. याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्या लावा. यामुळे खास फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Aloe vera face packs : केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी या 5 मार्गांनी कोरफडचा वापर नक्की करा!

Health care tips : निरोगी आहार म्हणजे नेमके काय? जाणून घ्या या विषयी सविस्तर…

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.