AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair | केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा!

केस (Hair) गळण्याची समस्या सामान्य होत चालली आहे. अगदी कमी वयामध्येही केस गळतीचा त्रास अनेकांना होतो आहे. खराब खाण्याच्या सवयी, बदललेले पाणी आणि ताण ही केस गळण्याची महत्त्वाची कारणे आहेत. याशिवाय बदलत्या हवामानामुळे अनेकांना केस गळतीची समस्या निर्माण होते.

Hair | केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 9:49 AM
Share

मुंबई : केस (Hair) गळण्याची समस्या सामान्य होत चालली आहे. अगदी कमी वयामध्येही केस गळतीचा त्रास अनेकांना होतो आहे. खराब खाण्याच्या सवयी, बदललेले पाणी आणि ताण ही केस गळण्याची महत्त्वाची कारणे आहेत. याशिवाय बदलत्या हवामानामुळे अनेकांना केस गळतीची समस्या निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचा (Food) आहारात समावेश करायला हवा, ज्यामुळे आपकी केस गळतीची समस्या कायमची बंद होईल. केस गळण्यास सुरूवात झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण सुरूवातीला शॅम्पू आणि कंडिशनर (Conditioner) बदलतात. मात्र, हे करूनही केस गळतीची समस्या काही कमी होत नाही.

व्हिटॅमिन ई घेणे अत्यंत महत्वाचे

केस गळती कमी करण्यासाठी आहारामध्ये सुक्यामेव्याचा समावेश नक्की करा. कारण त्यामध्ये फॅटी अॅसिड, ओमेगा-3, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटक असतात. त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच तुम्ही अंड्याचा हेअर मास्क देखील वापरू शकता. केसांना हेअर मास्क वापरून मजबूत बनवता येते, पण केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी केसांमध्ये अंड्याचा हेअर मास्क वापरण्यासोबतच तुम्ही अंड्यांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.

दही आणि अंडी

केस गळतीचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात सीफूडचा समावेश करावा. सीफूडच्या सेवनाने तुमचे केसही मजबूत होतील. सीफूडमुळे आपल्याला अॅसिड, व्हिटॅमिन डी, ओमेगा -3 मिळते. यामुळे केस गळतीची समस्या कमी होते. शिवाय केस धुतल्यानंतर लगेचच विंचरण्याची सवय अनेकांना असते. मात्र, हे करणे टाळा आणि अगोदर केस चांगले सुकूद्या. तसेच केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी दही आणि अंड्याचा मास्क केसांना लावणे फायदेशीर ठरते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :  Skin Care Tips : त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!

Health care tips : वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर!

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!